Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॅसिकॉन २०२४ मध्ये भारतातील तज्ञांचे नवनवीन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे परिषदेचे आयोजन

नाशिक- द असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि नाशिक सर्जिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मॅसिकॉन २०२

केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा इशारा
ओबीसी आरक्षणावर नवीन बिल आणणार ; अजित पवार | LOKNews24
अंमली पदार्थ माफिया ललित पाटीलला पोलिसांनी केली अटक

नाशिक- द असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि नाशिक सर्जिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मॅसिकॉन २०२४ या राज्यस्तरीय परीषदेचे आयोजन केले आहे. त्र्यंबकरोडवरील दी डेमोक्रेसी हॉटेल्स ऍण्ड रिसॉर्टस् ऍण्ड कव्हेंशन सेंटर येथे ही परीषद पार पडणार असून, परिषदेचे उद्घाटन एएसआयचे अध्यक्ष डॉ. प्रोबल नियोगी (प्रयागराज), सचिव डॉ. प्रताप वरूटे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी स्टेट प्रेसिडेंट संजय कोलते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या परीषदेत राज्यभरातून शल्यचिकित्सक डॉक्टर सहभागी होणार असल्याची माहिती परीषदेच्या आयोजन समितीचे आयोजन समिती सचिव डॉ.महेश मालु, अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी, सहअध्यक्ष डॉ.सुधीर भामरे, खजिनदार डॉ.नंदकिशोर कातोरे, मार्गदर्शक डॉ.प्रमोद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती देतांना आयोजन समितीचे सचिव डॉ. महेश मालु म्हणाले, ’एएसआय’च्या महाराष्ट्र शाखेची ४६ वी वार्षिक परीषद मॅसिकॉन २०२४ चे नाशिकमध्ये आयोजन केले आहे. ही परीषद यशस्वी व्हावी यासाठी नाशिक सर्जिकल सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य डॉक्टर परीश्रम घेत आहेत. परीषदेची तयारी अंतिम टप्यात असून, राज्यभरातून येणार्या डॉक्टरांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. सहभागी डॉक्टरांना रुग्णसेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हावा, या दृष्टीकोनातून सत्रांचे आयोजन केले आहे.

अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, परीषदेनिमित्त वेगवेगळ्या समित्यांची स्थापना केलेली आहे. परीषदेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. तसेच स्मरणिका व माहितीपत्र प्रकाशित केले जाईल.

त्याचप्रमाणे मार्गदर्शक डॉ. प्रमोद शिंदे म्हणाले की,  भारतभरातून तज्ञ डॉक्टर्स नाशिकमध्ये येणार असून त्यांचे  नवऩवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.अद्वय आहेर म्हणाले, या परीषदेत निष्णात शल्यचिकित्सकांकडून आपले शोधप्रबंध सादर केले जातील. तसेच राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन सहभागी डॉक्टरांना मिळणार आहे. त्यादृष्टीने सत्रांचे नियोजन आखले आहे. प्रात्येक्षिकांवर आधारित काही कार्यशाळादेखील यावेळी पार पडतील.

परीषदेसाठी आयोजन समितीचे खजिनदार डॉ. नंदकिशोर कातोरे,सहसचिव  डॉ. नितीन रावते, डॉ. नागेश मदनुरकर,डॉ. कैलास मोगल, डॉ. स्वप्निल पारख, डॉ. हर्षद महात्मे, डॉ. राज नगरकर, डॉ. शितल पाटील यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य परीश्रम घेत आहेत.

COMMENTS