Homeताज्या बातम्यादेश

एकाच कुटुंबातील 3 मुलांचा दुर्देवी मृत्यू

  रोहतक - देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच लैंगिंक अत्याचाराच्या घटनांमध्येह

शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले
‘कुत्रा आहे, भुंकतोय, भूंकू द्या’, राज ठाकरेंवर खोचक टीका | LokNews24
समृद्धीवर मध्यरात्री मृत्युचे तांडव

  रोहतक – देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच लैंगिंक अत्याचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत आहे. यासोबतच आर्थिक फसवणुकीच्याही घटनाही समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच परिवारात 3 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच परिवारातील 7 जणांची रात्री जेवणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तब्येत खराब झाली. यानंतर मध्यरात्री 3 मुलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राजेशची मुलगी दिव्या (7 वर्ष), इयांशू (2 वर्ष) आणि राकेशची मुलगी लक्षिता (8 वर्ष) या तिघांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्य गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना हरयाणा राज्यातील रोहतकच्या बालंद गावात घडली. दरम्यान, ही घटना एक अपघात होता की यामागे काही कट होता, याबाबतचा खुलासा हा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होणार आहे. असे सांगितले जात आहे, 15 ऑगस्टच्या रात्री बनवण्यात आलेली भाजी खाल्ल्यानंतर परिवारातील सदस्यांची तब्येत खराब झाल्याची घटना समोर आली. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र इथे उपचारांदरम्यान, राजेशची मुलगी दिव्या (7 वर्ष), इयांशू (2 वर्ष) आणि राकेशची मुलगी लक्षिता (8 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला.

COMMENTS