Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’प्रतापगड’ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी : संस्थापक पॅनलचे आवाहन

शेतकरी सभासदांच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे घेत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याचा अर्थ आम्ही निवडणुक लढवू शकत नाही, असा चूकून

कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
राज्यात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर


शेतकरी सभासदांच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे घेत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याचा अर्थ आम्ही निवडणुक लढवू शकत नाही, असा चूकूनही गैरसमज कोणू करून घेऊ नये. प्रतापगड कारखानाचे विद्यमान संस्थापक पॅनेल हे सातारा-जावली विधानसभेचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधानपरिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांना सोबत घेऊन आगामी निवडणुकीला आम्ही सामोरे जावू. निवडणुकीआधीच संस्थापक पॅनेलच्या महिला प्रतिनिधीच्या दोन संचालक या बिनविरोध निवडून आल्याने विजयाची सुरूवात संस्थापक पॅनेलने आधीच केली आहे.

कुडाळ / वार्ताहर : प्रतापगड सहकारी साखर कारखाना ही जावळी तालुक्याची अस्मिता आहे. कारखान्याची येऊ घातलेली निवडणुक बिनविरोध व्हावी याकरीता तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांसह संस्थापक पॅनेलची व तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. त्याप्रमाणे तालुक्यातील कोणताही पक्ष, गट-तट न ठेवता सर्वांना विचारात घेऊन कारखाना निवडणूक बिनविरोध प्रक्रियेसाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन संस्थापक पॅनेलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
संस्थापक पॅनेलने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, जावली तालुक्यातील शेतकरी सभासद व कामगारांच्या हक्काचा असलेला कारखाना निवडणुकीपेक्षा कोणत्याही परिस्थितीत सुरू करणे ही खरी मोठी लढाई आहे. याकरीता कारखाना सहकारात टिकवण्यासाठी, सभासदांच्या मालकीचा राहील, याकरीता खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड-किसन वीरमध्ये 16 वर्षांसाठी करार करण्यात आला होता. आठ वर्षांपासून कारखाना हा किसन वीरच्या ताब्यात आहे. त्यातील 5 वर्ष किसन वीरने कारखाना चालवला. सध्या किसन वीर कारखाना अडचणीत असल्याने मागील तीन वर्षांपासून प्रतपगड कारखाना बंद आहे. प्रतापगड संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. मात्र, काही कायदेशीर बाबींची अडचणी दूर झाल्याशिवाय कारखाना सुरू होत नाही, हे सभासदांसमोर आम्ही स्पष्टपणे मांडत आहोत.
कायदेशीर मार्गाने करार संपुष्टात आणून हा कारखाना स्वबळावर चालू करण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. त्या प्रक्रियेला खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री आजितदादा पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह अनेकांचे सहकार्य मिळत आहे. किसन वीरचा योग्य तो प्रतिसाद याकामी मिळत असून सगळ्यांच्या पाठबळावर निश्‍चितच पुढील हंगामात प्रतापगड कारखाना हा स्वबळावर ऊभा राहणार याची आम्ही आपणास यानिमित्ताने जाहिर कबुली देत आहोत, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कारखान्याची येऊ घातलेली निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा यापुर्वीं दिलेला आहे. त्याबददल सर्वांचेच आम्ही मनापासून ऋणी आहोत. कारखाना बिनविरोध व्हावा व कारखान्यावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडूनये याच कारणासाठी आपण निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करत आहोत. याचा गैरफायदा घेऊन जाणीवपूर्वक संस्था खड्ड्यात घालण्याच्या उद्दीष्टाने निवडणुक लावण्यासाठी काही बिगर सभासद मंडळी आतुर असतील, तर दिवंगत माजी आमदार लालसिंगराव शिंदे, दिवंगत राजेंद्र शिंदे यांचे विचार जपण्यासाठी व संस्था सहकारात टिकवत काका-भैय्यांचे विचार जोपाण्यासाठी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून ताकदीने निवडणुक लढवली जाईल.

COMMENTS