Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू; रांगणा किल्यावरील घटना; मृत तरुण पणूंब्रे-वारुण येथील

शिराळा / प्रतिनिधी : रांगणा (ता. भुदरगड) येथील किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या पणुंब्रे-वारुण (ता. शिराळा) येथील तरुणाचा तलवात बुडून दु

भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला : ना. जयंत पाटील
येलूर ग्रामपंचायत बिनविरोध : महाडीक गटाला सरपंच पद
माणसासह वाहनांच्या गर्दीने सतोबाचा डोंगर फुलला

शिराळा / प्रतिनिधी : रांगणा (ता. भुदरगड) येथील किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या पणुंब्रे-वारुण (ता. शिराळा) येथील तरुणाचा तलवात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. 17 रोजी घडली. ओमकार भिमराव पाटील (वय 19) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पणूंब्रे-वारुण येथील तीस-चाळीस युवक शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी बुधवार, दि. 16 रोजी रांगणा किल्ल्यावर गेले होते. गुरुवारी किल्ल्यावरील परिसरासह तलावाची स्वच्छता केल्यानंतर दुपारी पोहायला गेलेला ओमकार अचानक तलावात बुडुन बेपत्ता झाला. त्याच्या सोबत असणार्‍या युवकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो आढळून आला नाही.
त्याचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने गुरुवारी सकाळपासूनच मोटर बोटीच्या सह्याय्याने शोध मोहीम सुरु केली. अखेर शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यास पथकाला यश आले. ओमकार हा सोनवडे येथील शाळेमध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. शाळा शिकत-शिकत पंचवीस-तीस शेळीचे संगोपन करण्याचा प्रकल्प त्याने सुरू केला होता. त्याचे वडील ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आहेत.
भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह सलग दोन दिवस शोध मोहीम सुरू ठेवली होती. गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाणूंब्रे-वारुण येथे या युवकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या ओंकारच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS