राहुरी/प्रतिनिधी ः वयोवृद्ध झाल्याची खंत न बाळगता मजेत जगा, प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या जीवनाचा मनमुराद आनंद घ्या असा सल्ला माजी खासदार प्रसाद तन
राहुरी/प्रतिनिधी ः वयोवृद्ध झाल्याची खंत न बाळगता मजेत जगा, प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या जीवनाचा मनमुराद आनंद घ्या असा सल्ला माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी जेष्ठ नागरिकांना दिला. राहुरी नगरपालिकेच्या सभागृहात आज जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या सत्कार प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपूरे मार्गदर्शन करीत होते.यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोबरे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसाद तनपुरे म्हणाले की, आज जे जेष्ठ नागरिक आहे त्यांना या वयात खूप गोष्टी कराव्याश्या वाटत पण ते करणे जमत नाही. आपण कितीही वयाने मोठे झालो तरी आपण आपले दैनंदिन जीवनमान बदलू नका सतत कार्यरत राहा, आळस करू नका त्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो तो एक वेगळाच असतो. आपण आपल्या वयात अनेक गोष्टी केल्या, आता पुढच्या पिढीची काळजी अजिबात करू नका. तुम्ही स्वतः सक्षम व्हा, वृद्ध झालो असलो वयाने मोठे झालो तरी आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा नवीन पिढीला द्या.आपण ज्ञान व अनुभवाने खूप मोठे आहोत. आपल्या ज्ञानाचा फायदा व अनुभवाची शिदोरी नवीन पिढीला द्या त्यांना आजच्या मोबाईल व टीव्हीच्या जमान्यात संस्काराची गरज आहे. या दोन्ही गोष्टीने समाजातील सर्व वातावरण बिघडत चालले आहे. आजच्या पिढीला वेळेचे महत्व शिकवले पाहिजे.नवीन पिढीचे काही चुकत असेल तरत्यांनी विचारले तरच त्यांना सल्ला द्या,अन्यथा लुडबुड करून नका. योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आज सर्वत्र जेष्ठ नागरिकांच्या संघटना उभरल्या जात असताना राहुरी सारख्या शहरात जेष्ठ नागरिकांची संघटना पाहिजे अशी वाढली नाही संघटना वाढली पाहिजे ह्या संघटनेत 50 टक्के महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे त्यांनाही या प्रवाहात सामावून घेण्याचे आवाहन तनपुरे ह्यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोबरे ह्यांनी आपले विचार मांडले. जेष्ठ नागरिक दिनाच्या सर्वांना पालिकेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेले अनेक जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्पासाहेब तनपुरे ह्यांनी आभार तर पराग कुलकर्णी ह्यांनी सूत्रसंचालन केले.
COMMENTS