खाजगी सावकाराची पोलीसांकडून पाठराखण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाजगी सावकाराची पोलीसांकडून पाठराखण

देवळाली प्रवरा प्रतिनिधी        राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खाजगी सावकाराच्या ञासाला कंटाळून एका शेतक-यान

सोमवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये राष्ट्रवादी शहरात लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवणार
मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले |
‘वाराई’च्या प्रश्नासंदर्भात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

देवळाली प्रवरा प्रतिनिधी

       राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खाजगी सावकाराच्या ञासाला कंटाळून एका शेतक-याने विषारी ओषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक असुन अहमदनगर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्ना पुर्वी त्याने लिहीलेल्या चिठ्ठीची अद्याप राहुरीच्या पोलीस निरीक्षकांनी दखल घेतली नाही.टाकळीमियाँ व राहुरी फँक्टरी येथिल खाजगी सावकारकी प्रमाणे मानोरी येथिल शेतकऱ्यांचे प्रकरण वाऱ्यावरच सुटले जाणार असल्याने खाजगी सावकारकीच्या  कचाट्यातुन त्या नागरिकांची सुटका कोण करणार? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.

            मानोरी येथील शेतकरी ज्ञानदेव विठ्ठल शेळके यांनी शुक्रवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना तात्काळ रूग्णांलयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यांच्या जवळ  एक चिठ्ठी लिहून सापली आहे. या चिठ्ठीमधे सावकारकी बाबत लिहले आहे.हि चिठ्ठी राहुरीचे पोलीस निरीक्षक यांच्या नावाने लिहलेली आहे. चिठ्ठीत मी स्वतः ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी ता.राहुरी जबाब लिहुन देतो की,मी तीन वर्षांपूर्वी मानोरी गावातील चार खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले आहे.त्याचे आजपर्यंत मुदली पेक्षा दुप्पट व्याज दिले आहे.खाजगी सावकाराने माझ्या कडून  स्टेट बॅंकेचे चेक घेतलेले आहे.खाजगी सावकारांनी मला वारंवार पैक्षाचा तगादा करुन  मानसिक ञास दिला आहे.त्यांच्या ञासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे.अशी चिठ्ठी राहुरीचे पोलीस निरीक्षक यांच्या नावाने लिहलेली असुन शनिवारी राहुरी पोलीसांनी  या चिठ्ठी बाबत व चार खाजगी सावकारां बाबत माहिती घेतली. या चार हि सावकारांची एका हाँटेल मध्ये शनिवारी उशिरा बैठक झाल्याची समजते.या बैठकीतून या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मोठी तडजोड ठरल्याचे हि समजते.

                 राहुरीचे पोलीस निरीक्षक मानोरीच्या शेतकऱ्यांला न्याय मिळून देणार की, राहुरी फँक्टरी हाँटेल चालकाने सावकाराच्या छळास कंटाळून हाँटेल बंद करून पलायन केले आहे तर टाकळीमियाँ येथिल ठेकेदाराने सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.या दोन्ही घटना जशा दाबल्या गेल्या.या दोन्ही घटनेवर पडदा टाकण्यासाठी मोठी तडजोड झाली असल्याची चर्चा आहे. या दोन्ही घटने प्रमाणेच मानोरीच्या शेतकऱ्यांची खाजगी सावकारकीची घटना हि दाबली जाणार की काय असा सवाल तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.

COMMENTS