नवी दिल्ली ः टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क लवकरच भारत दौर्यावर येणार असून, त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. इलॉन मस्क भारतात 22

नवी दिल्ली ः टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क लवकरच भारत दौर्यावर येणार असून, त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. इलॉन मस्क भारतात 22 एप्रिल रोजी येणार असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भारत भेटीदरम्यान ते दोन ते तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ई-वाहन उत्पादक टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारताला भेट देणार आहेत. यादरम्यान ते दोन ते तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. याद्वारे येथे कारखाना उभारण्यात येणार आहे. या दौर्यात मस्क सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मात्र, मस्क यांच्या भारतभेटीबाबत आणि त्यादरम्यान कोणतीही तपशीलवार अधिकृत माहिती शेअर केली जात नाही.
COMMENTS