Homeताज्या बातम्याविदेश

एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा

ट्विटर स्वतः एक सोशल मीडिया साइट आहे. त्याचे सीईओ एलॉन मस्क आहेत. गेल्या वर्षी एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये

बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने मानले आभार
एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर
एलन मस्क ट्विटरचा लोगो बदलणार

ट्विटर स्वतः एक सोशल मीडिया साइट आहे. त्याचे सीईओ एलॉन मस्क आहेत. गेल्या वर्षी एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. यापुढेही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. मग कर्मचाऱ्यांची कपातीच निर्णय असो, किंवा ब्लू टिक काढण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा ट्विटरसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लवकरच एलॉन मस्क यांचा लवकरच सीईओ पदावरुन पायउतारा घेणार आहेत.  अब्जाधीश एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विट करून ते ट्विटरचे सीईओ पद सोडत असल्याचे जाहीर केले. आणि या पदावर नवीन सीईओची निवड होणार असल्याचे देखील स्पष्ट केले. त्यांनी नवीन सीईओचे नाव जाहीर केले नाही. मात्र नवीन सीईओ एक महिला असेल, असे संकेत मस्क यांनी दिले आहेत. 

याबाबत एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विट करताच ही घोषणा केली. ‘मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की, मी नव्या सीईओची निवड केली आहे. ती व्यक्ती सहा आठवड्यांच्या आत जबाबदारी सांभाळली. मी सीईओ पदाचा राजीनामा देईन आणि ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य प्रौद्योगिक अधिकारी म्हणून काम करेन.’ त्यामुळे नवीन व्यक्तीची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्यानंतरही  एलॉन मस्क ट्विटरशी संबंधित निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते यापुढे आता कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत राहतील. त्यामुळेच कंपनीचे उत्पादन आणि सॉफ्टवेअरशी संबंधित बाबींवर ते लक्ष ठेवतील.  एलॉन मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. एलॉन मस्कने गेल्या महिन्याच्या अखेरीस ट्विट करून वापरकर्त्यांना सूचित केले होते की, युजर्सना प्रत्येक खात्यानुसार फी भरावी लागेल, असे त्यांनी सांगितले असते. ते म्हणाले होते की, जर₹ वापरकर्त्याने मासिक सदस्यतासाठी साइन अप केले नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार. दर दुसरीकडे महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ट्विटरच्या वापरकर्त्यांना मिळणारी ब्लू टिक ही सशुल्क केली. त्या निर्णयाला अनेक युजर्सने विरोध केला.. मुदत संपल्यानंतर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींची ही ब्लू टिक गायब झाली होती. मात्र अनेकांनी पैसे भरल्यानंतर ही ब्लू टिक त्यांना परत मिळाली

COMMENTS