अपमान जनक वागणुकीमुळे बौद्ध भिक्षुकांचा एल्गार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपमान जनक वागणुकीमुळे बौद्ध भिक्षुकांचा एल्गार

ठाणे प्रतिनिधी - बौद्ध भिक्षूंना त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आज सर्व बौद्ध भिक्षुक एकत्र येत निषेध आंदोलन करण्यात आले.  मागील चार वर्षांपासून

महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर -संतोष माणकेश्‍वर
माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दहावी-बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे; सुधारित वेळापत्रक जाहीर

ठाणे प्रतिनिधी – बौद्ध भिक्षूंना त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आज सर्व बौद्ध भिक्षुक एकत्र येत निषेध आंदोलन करण्यात आले.  मागील चार वर्षांपासून काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच बौद्ध विहारांमध्ये येत बौद्ध भिक्षूकांना त्रास दिला असल्याचा आरोप करत हे निषेध आंदोलन करण्यात आले.  या समाजकंटकांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी देखील बौद्ध भिक्षुकांनी यावेळेस केलेले आहे. मागील चार वर्षांपासून हा त्रास होत आहे मात्र बौद्ध भिक्षुक हे शांतता प्रिय आहेत, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू शकत नाही आणि यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये देखील कंप्लेंट केलेले आहे, मात्र कोणीही दखल घेतली नाही आणि त्यामुळे आज सर्व बौद्ध भिक्षकांना या ठिकाणी येऊन आंदोलन करावं लागतं असं देखील बौद्ध भिक्षुकांनी सांगितले. तर या सर्व प्रकारावर लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी बौद्ध भिक्षुकांनी केली. तर त्रास देणाऱ्या व्यक्तींना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे देखील बौद्ध भिक्षुकाने सांगितले. तसेच ते काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचा देखील बौद्ध भिक्षूकानी सांगितले.

COMMENTS