Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी महत्वाचे पाउल : डॉ. भारती पवार 

दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप

नाशिक । केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीव

भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत – डॉ. भारती  पवार
सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करावे -केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगावी : डॉ. भारती पवार

नाशिक । केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक जिल्ह्यातील एक हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या.

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे दूरदृष्टीप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर आमदार प्रा. देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को ) चे व्यवस्थापक अजय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तिकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. एलिम्को कंपनी मार्फत देण्यात येणार्‍या साहित्याचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांनी जाणून घ्यावी, ज्यामुळे सहाय्यक साहित्याचा वापर करणे सहज शक्य होईल.म्हणूनच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांना त्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणे करून कोणीही दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टिने प्रयत्न करावेत. अशा सूचनाही यावेळी केंदीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

इलेक्ट्रिक ट्रायसिकल, व्हिल चेअरचे वाटप – कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येकी दोन इलेक्ट्रीक ट्रायसिकल, व्हिल चेअर, श्रवण यंत्र, दृष्टिबाधितांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन(काठी) साहित्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. भारती पवार यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर मार्गदर्शन करून योग्य कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचित केले.

यांना मिळाला लाभ – एकूण दोन हजार 287 लाभार्थ्यांपैकी जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, देवळा, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड व येवला या 10 तालुक्यातील एक हजार 397 लाभार्थ्यांना साधारण 7 ते 8 कोटी रुपयांच्या कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित ५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना नंतरच्या टप्प्यात कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

COMMENTS