Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 फुले-आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश बांगर व स्वागताध्यक्षपदी ड.सुरेश हात्ते यांची निवड

गेवराई प्रतिनिधी- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वजनिक संयुक्त जयंती

पाण्याच्या वादातून कोयत्याने वार
संसदेत असंसदीय शब्दांना निर्बंध
लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांचे स्थलांतर | LOKNews24

गेवराई प्रतिनिधी- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांची बैठक पावन दत्त मंदिर संस्थान याठिकाणी शनिवारी पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवानेते गणेश दादा बांगर यांची व स्वागताध्यक्ष म्हणून ड.सुरेश हात्ते तर उपाध्यक्षपदी – उपसरपंच आज्जूशेठ सौदागर व शिवसेनेचे गटनेते गोविंदप्रसाद जोशी आणि सचिवपदी प्रा.शाम कुंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जयंती उत्सव समितीची उर्वरीत कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – सहसचिव सौदागर शहेनशाह, संघटक – राजाभाऊ विटकर, सहसंघटक – डॉ.आसाराम मराठे, कोषाध्यक्ष – राजाभाऊ खिस्ते, सहकोषाध्यक्ष – युवराज गर्जे, कार्याध्यक्ष – सरपंच पती विष्णू तात्या हात्ते, संयोजक, विजय डोंगरे सर यांची निवड करण्यात आली असून सदस्यपदी – शेख खलीलभाई, बळीराम अण्णा शिंदे, गणपत नाटकर सर, नवनाथ पवार सर, नजीरभाई कुरेशी, एल.जी.जाधव, रवी मरकड, साहेबा कुर्‍हाडे, प्रितम गर्जे, तुळशीराम वाघमारे, मदन हतागळे, सुरेश गांधले, कृष्णा गर्जे, पप्पू तेलुरे, ठकाराम सुरासे, सुरेश शिंदे, विठ्ठल हात्ते, विष्णू काळे, महेश मरकड, धोंडीबा हातागळे, विठ्ठल चव्हाण, किशोर डहाळे, पिंटू राऊत, शेख सद्रोद्दीन ( फौजी ), बंडू धापसे, कैलास राठोड, दिलीप अप्पा शेटे, चेअरमन जयराम नाटकर, शेख रफिक, दादाराव रोकडे आदींची निवड करण्यात आली आहे. जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक म्हणून माजी जि.प.सदस्य – युवराज तात्या डोंगरे, माजी जि.प.सभापती गिताराम डोंगरे, माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब आठवले, महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर, अशोक आठवले, अंबादास आठवले, मदन करडे, विनोद आठवले, आनंद डोंगरे आदींचा समावेश करण्यात आला आहे. दि.11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा याठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच दि.14 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथातून साध्या पद्धतीने मिरवणूक काढून त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.19 एप्रिल रोजी सायंकाळी ठिक आठ वाजता सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान व दि.20 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता गीतगायन ( सवाल-जवाब ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सार्वजनिक जयंती निमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमास तलवाडा व तलवाडा परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS