Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र महेश्‍वर व अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर

आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थक्षेत्रांना आ. आशुतोष काळे यांनी क’ वर्ग दर्जा मिळवून दिला असून उर्वरित देवस्थानांना देखील ‘क’

शेतकर्‍यांना अग्रिम पीकविमा देण्यासाठी सुनावणी घ्या
अण्णा भाऊ साठे योजनेच्या 1.65 कोटींच्या कामास मान्यता
श्री साईगाव पालखीचे पूजन करून आ. काळेंनी दिल्या शुभेच्छा

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थक्षेत्रांना आ. आशुतोष काळे यांनी क’ वर्ग दर्जा मिळवून दिला असून उर्वरित देवस्थानांना देखील ‘क’ वर्ग मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यातून मतदार संघातील कोळपेवाडी व पंचक्रोशीतील अनेक गावांचे श्रद्धास्थान असलेल्या कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्‍वर देवस्थानास व माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 मतदार संघातील कोळपेवाडी व पंचक्रोशीतील अनेक गावांचे श्रद्धास्थान असलेल्या कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा व या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अशी कोळपेवाडी ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती. त्याच प्रमाणे माहेगाव देशमुख येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानाचा देखील विकास व्हावा अशी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्‍वर देवस्थानास व माहेगाव देशमुख येथील श्री क्षेत्र अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून गुरूवार (दि.16) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्‍वर देवस्थानास व माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्‍वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने लागु करा – आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव मतदार संघाचा दुष्काळाग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाला असून त्या पार्श्‍वभूमीवर कोपरगाव मतदार संघात दुष्काळाच्या देण्यात येणार्‍या उपाय योजना व सोयी सुविधा तातडीने लागू करा. महावितरणचे पोल शिफ्टिंग व नवीन ट्रान्सफार्मर चे कामाकरिता निधी वाढून मिळावा, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकास कामांना निधी मिळावा, मतदार संघातील पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकामासाठी आवश्यक निधीस मंजुरी मिळावी, सोलर हायमॅक्स मिळावे व 3054 व 5054 रस्त्याचे कामाकरिता निधी वाढवून मिळावा. कोपरगांव विधानसभा मतदार संघातील रब्बी हंगामातील 163 गावांचा समावेश खरीप हंगामात करावा अशा मागण्या आमदार काळे यांनी केल्या आहेत.

COMMENTS