छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चा व स्मायलिंग अस्मिताचेही उपोषण

अहमदनगर/प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले खा. छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी नगरकरांनी पुढाकार घेतला

बीएसएनएल बंद करणार नाही व खासगीकरणही नाही ; केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांची ग्वाही
श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदी अतुल लोखंडे
मेंढेगिरी समिती नगर-नाशिक शेतकर्‍यांचा बळी घेणार का?

अहमदनगर/प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले खा. छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी नगरकरांनी पुढाकार घेतला आहे. येथील मराठा क्रांती मोर्चाने जुन्या बसस्थानकाजवळ तर स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाजवळ उपोषण केले.
मराठा आरक्षणाबाबत आश्‍वासने देऊनही त्याची पूर्ती होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारपासून (26 फेब्रुवारी) मुंबईत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनास राज्यभरातून विविध संघटनांचा पाठिंंबा मिळत आहे. शनिवारी त्यांनी उपोषण सुरू केल्यावर येथील स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेसह ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या सदस्यांनीही शनिवारी उपोषण केले व मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने रविवारी उपोषण आंदोलन करीत छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने नगर शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत अशोकराव चव्हाण, सुरेखाताई सांगळे, दत्ता वामन, रावसाहेब काळे, ओमकार घोलप, सागर ठोंबरे, योगेश खेडके, आशाताई गायकवाड, विलास तोरडमल, सागर मिसाळ, किरण फटांगरे, मयुर भापकर, अंकुश भापकर, शुभम कोमाकुल, श्रीकांत लगड, आकाश भोसले, निखिल गहिले, देवीदास मुदगल, सागर गुंजाळ आदी उपोषणाला बसले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन
छत्रपती संभाजी राजेंना पाठिंबा देण्यासाठी ’स्मायलिंग अस्मिता’सह ऑल इंडिया युथ फेडरेशनने छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे उपोषण केले. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी दिवसभर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन केले. छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अमोल गाडे, यशवंत तोडमल, शुभम पांडुळे, रिनुल नागवडे, महापालिकेचे अधिकारी मेहेर लहारे, सागर कराळे, धनंजय कुमटकर, सागर दळवी, सचिन सापते, जैद शेख, गौरव नरवडे, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, अरूण थिटे यांनी उपोषण सुरू केले. यावेळी गाडे म्हणाले की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, कुमटकर म्हणाले, सारथी संस्थेचे पैसे सरकारने वेळेवर अदा करावे जेणेकरून उच्च शिक्षणाला याचा फायदा होईल. ग्रामीण भागातील मराठा विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी मोफत वसतीगृहाची सोय झाली पाहिजे अशी मागणी नरवडे यांनी केली. सरकारने दरवेळी नव्याने आरक्षण दिले आणि आम्ही नवनवे दाखले तहसीलदार कार्यालयातून मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च केले, ही आमची फसवणूक आहे, असे कवळे म्हणाले, तर पांडुळे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पैसे शासनाने थकवले आहे व त्यामुळे आमच्यासारख्या तरूणांना व्यवसायात कर्ज मिळत नाही. यावेळी स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष तोडमल यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी मराठा समाजाला वार्‍यावर सोडले आहे. राज्यात तर सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात फक्त पकडापकडीचा खेळ सुरू आहे आणि मुख्य समाजाच्या प्रश्‍नांवर दोघेही डोळेझाक करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

नगरच्या प्रणालीचे कौतुक
नगरची शिवव्याख्याती प्रणाली कडूसने रविवारी मुंबईतील आझाद मैदान गाजवले. खा. संभाजीराजे यांच्या उपोषणस्थळी तिने केलेल्या जोशपूर्ण अशा 22 मिनिटांच्या भाषणाचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. श्रीमंत युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्याकडूनही प्रणालीचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच रायगडावर आयोजित होणार्‍या कार्यक्रमासाठी तिला निमंत्रित करण्यात आले. या आंदोलनस्थळी छावा संघटनेचे धनंजय जाधव व राज्य संपर्क प्रमुख सुमित दरंदले यांनी नगरची बालशिवव्याख्याती प्रणाली बाबासाहेब कडूस हिला शनिवारी (दि.26) दुपारीच आमंत्रित केले होते. त्यानुसार प्रणाली ही तिच्या आई-वडिलांसमवेत रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली. रविवारी (दि.27) सकाळी आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या जनसमुदायासमोर बोलण्यासाठी तिला पाचारण करण्यात आले. तिने तब्बल 22 मिनिटे अतिशय जोशपूर्ण भाषण करीत आरक्षण नसल्याने गोरगरीब मराठा समाजावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडली. तिच्या भाषणाने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद दिली. प्रणाली ही नगर तालुक्यातील सारोळा कासार गावची कन्या आहे.

COMMENTS