Homeताज्या बातम्यामनोरंजन

आरआरआर फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन

वयाच्या 58 वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई प्रतिनिधी - मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रे स्टीव्हनसन यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन झ

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीला समजावून सांगण्यासाठी महिलांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी
माजी न्यायमूर्ती टी.बी. राधाकृष्णन यांचे निधन
संयमीच्या भेटीला आला ‘क्रिकेटचा देव’

मुंबई प्रतिनिधी – मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रे स्टीव्हनसन यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. आयरिश वंशाचा अभिनेता शेवटचा एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसला होता. ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. दोन दिवसांनी, म्हणजेच 25 मे रोजी रेचा वाढदिवस होता. मार्वलच्या ‘थोर’ मध्ये दिसलेले रे स्टीव्हनसन यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. एसएस राजामौली यांच्या ऑस्कर विजेत्या ‘RRR’मध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात रे स्टीव्हनसन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्यांनी ‘स्कॉट बक्सटन’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या कारकिर्दीतील हा पहिला भारतीय चित्रपट होता. रे यांचा जन्म 25 मे 1964 रोजी उत्तर आयर्लंडमध्ये झाला होता. त्यांचे वडील पायलट होते आणि वयाच्या 8 व्या वर्षी ते कुटुंबासह इंग्लंडला गेले होते. रे यांनी मनोरंजनसृष्टीत प्रचंड नाव कमावलं आहे. त्यांनी अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या, ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली आहे. ‘पनीशर: वॉर जान’, ‘द थिअरी ऑफ फ्लाइट’, ‘किंग आर्थर’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच ते ‘द वॉकिंग डेड’, ‘स्टार वॉर्स’, ‘वायकिंग्स’, ‘ब्लॅक सेल्स’, ‘डेक्स्टर’ सारख्या शोसाठीही ओळखले जातात.

रे स्टीव्हन्सन यांनी तुफान लोकप्रिय ठरलेल्या आरआरआर या चित्रपटात खलनायकाची जबरदस्त भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. रे यांना मार्वलच्या ‘थोर’ चित्रपटासाठीसुद्धा ओळखलं जातं. रे स्टीव्हनसन हे हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी 1990 मध्ये त्यांनी आपल्या सिने करिअरची सुरुवात केली होती. याकाळात त्यांनी युरोपियन टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. 1998 मध्ये आलेल्या ‘थ्योरी ऑफ फ्लाईट’ या चित्रपटाद्वारे त्यांना मोठ्या पडद्यावर पहिला ब्रेक मिळाला होता. त्यांनंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

COMMENTS