Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये ईडीचे 13 ठिकाणी छापे

भोला ड्रग्ज प्रकरणी कारवाई 3 कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बुधवारी आपला मोर्चा पंजाब राज्याकडे वळवला असून, याठिकाणी मनी लाँड्रिंगसंबंधी रूपनगर जिल्ह्यात 13 ठ

राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकार्‍याच्या घरीच छापे
ईडीची बंगाल, तामिळनाडूमध्ये छापेमारी
ईडीची राज्यभरात छापेमारी

नवी दिल्ली ः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बुधवारी आपला मोर्चा पंजाब राज्याकडे वळवला असून, याठिकाणी मनी लाँड्रिंगसंबंधी रूपनगर जिल्ह्यात 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.  या छाप्यादरम्यान ईडीने आतापर्यंत तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश सिंग उर्फ भोला ड्रग्स प्रकरणात ईडीने जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम केले जात असल्याचे चौकशीत आढळले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नसीब चंद आणि श्री राम क्रशर यांचा अवैध खाण प्रकरणात सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान आतापर्यंत सुमारे 3 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, हे ड्रग्ज मनी लाँड्रिंग प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या सिंथेटिक अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित आहे, जे 2013-14 दरम्यान पंजाबमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी ईडीने पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता, जो सामान्यतः भोला ड्रग्ज केस म्हणून ओळखला जातो. कुस्तीपटू ते पोलीस बनलेला ड्रग्ज माफिया जगदीश सिंग उर्फ भोला हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. भोलाला ईडीने जानेवारी 2014 मध्ये अटक केली होती. सध्या पंजाबच्या पीएमएलए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

COMMENTS