शिवसेना खा. राऊत यांच्या नावाने करणार दशक्रिया विधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना खा. राऊत यांच्या नावाने करणार दशक्रिया विधी

नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी : वादग्रस्त विधान करणारे शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांच्या नावाने दशक्रिया विधी करण्याचा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाने दिला

“त्या’नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या दोन मंत्रिकांना अटक | LokNews24
न.पा. शाळेत जागतिक शिक्षक दिन साजरा
दैनिक लोकमंथन l फडणवीसांच्या डेटाबाँबमध्ये दडलंय काय?

अहमदनगर/प्रतिनिधी : वादग्रस्त विधान करणारे शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांच्या नावाने दशक्रिया विधी करण्याचा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाने दिला आहे. केवळ, राजकारणातल्या द्वेषापायी जर ब्राम्हण समाजावर टीका करणार असाल, तर येत्या काळात त्यांना त्यांची जागा व लायकी दाखवून देण्यात येईल, असे नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात जोशी यांनी सांगितले की, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी काल बुधवारी दिनांक 23/03/2022 रोजी भाषणात आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, असे वादग्रस्त विधान केले असून यामुळे अखिल ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सत्तेसाठी हापापलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर आपले हिंदुत्व इतर पक्षाच्या दावणीला बांधून हिंदु हृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विश्‍वासघात केला आहे. अशा शिवसेनेच्या खासदाराने आम्हा ब्राम्हणांना हिंदुत्व काय असते, हे शिकवू नये. येत्या पाच दिवसांत खा. राऊत यांनी आपले विधान मागे घेत बिनशर्त माफी मागावी अन्यथा, ब्राम्हण समाजाच्यावतीने खा. विनायक राऊत यांच्या नावाने नगरच्या अमरधाम स्मशानभूमी येथे दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा जोशी यांनी दिला आहे. याबाबत किशोर जोशी यांनी निवेदनातून खा.विनायक राऊत यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. यात ते पुढे म्हणाले आहेत की, शिवसेनेच्या स्थापनेवेळी हिंदु हृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून जे उभे होते, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अनेक सेनेचे नेते ब्राम्हणच होते. आजतागायत शिवसेनेच्या इतिहासात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या इतकी निष्ठा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने दाखविलेली नाही, हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे. कदाचित या गोष्टीचा वनायक राऊत यांना विसर पडलेला दिसतोय, असे स्पष्ट करून जोशींनी पुढे म्हटले आहे की, शेंडी जानव्याचेच ब्राम्हण्य माहीत नसणार्‍या खा.विनायक राऊत यांनी पुराणाचा व इतिहासाचा अभ्यास करावा. 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारे भगवान परशुराम हे ब्राम्हणांचे आद्यगुरू आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बल्लाळ भटांना पेशवेपदाची जबाबदारी दिली, तेही ब्राम्हणचं होते आणि त्यांचा इतिहास समस्त भारतवर्षाला माहिती आहे. त्यामुळे केवळ, राजकारणातल्या द्वेषापायी जर ब्राम्हण समाजावर अशी टीका करणार असाल, तर येत्या काळात त्यांना त्यांची जागा व लायकी दाखवून देण्यात येईल, असेही जोशींनी यात स्पष्ट केले आहे.

COMMENTS