Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास आघाडीतर्फे 11 कोटी निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशांचा गजर

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहराच्या विकासासाठी शिवसेनेने 11 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. या अकरा कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी तिसर्‍या

जावळीच्या ओझरे शाळेला भारत सरकारचा स्वच्छ विद्यालयाचा दुसरा पुरस्कार जाहीर
वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहराच्या विकासासाठी शिवसेनेने 11 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. या अकरा कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी तिसर्‍यांदा विशेष सभा घेण्यात आली. या सभेला राष्ट्रवादी नगरसेवकांनी तिसर्‍यांदा दांडी दिली आहे. शुक्रवार, दि. 19 रोजी या विकास कामांच्या निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशे घेऊन गजर करणार असल्याचे पालिकेचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी 11 कोटींचा निधी मंजूर करून आणलेला आहे . हा निधी आणला म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना राग आला आहे. त्यांनी स्वतःचे भान हरवले आहेत. शिवसेनेने आणलेल्या 11 कोटीचा निधी पाहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे डोळे पांढरे झाले आहेत. राष्ट्रवादी विषयी जनतेत असंतोष निर्माण झालेला आहे. शहराच्या विकास गप्पा मारून किंवा भूल थापा देऊन होत नाही. राष्ट्रवादीच्या ननगरसेवकाकडून शहर पीछाडीवर नेण्याचे काम सुरू केले आहे. जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन जाण्यास त्यांना तोंड राहिलेले नाही. कायद्याचा चुकीचा आधार घेत आहेत. पालिकेच्या सभेस उपस्थित राहत नाहीत. सत्तेच्या कालावधीत यांनी शहरासाठी काय केले? असा सवाल पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी उपस्थित केला.
इस्लामपूर शहरात भुयारी गटारीच्या कामाने शहरातील रस्ते उखडून पडले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जनसेवा हेच आमचे ब्रीद वाक्य आहे. हे विसरुन गेले आहेत. शहरातील उखडले रस्ते नवीन करण्यासाठी शिवसेनेमार्फत 11 कोटींचा निधी आणला आहे. या निधीतून शहर खड्ड्यातून मुक्त करण्यासाठी हा निधी आहे.

COMMENTS