Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे चारी नंबर 34 च्या वळणाला ओव्हरटेक करताना ईरटीका एम.एच.12 टि. वाय. 4352 व श्रीगोंदा शिरूर एसटीचा

भीषण अपघात ! वारकऱ्यांची ट्रक झाली पलटी
महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पुन्हा अपघात
विदर्भातील दोन अपघातात 13 जणांचा मृत्यू

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे चारी नंबर 34 च्या वळणाला ओव्हरटेक करताना ईरटीका एम.एच.12 टि. वाय. 4352 व श्रीगोंदा शिरूर एसटीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन दोन जण जागीच तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला व तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
हा अपघात एवढा भयंकर होता त्यामध्ये ईरटीका गाडीचा संपूर्ण चक्का चूर झाला आहे प्राथमिक माहिती अशी की मृत्यू झालेले व जखमी असलेले सर्व जण श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील रहिवाशी आहेत त्यामध्ये दत्तात्रेय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बाबुराव मडके , हरी तुकाराम लडकत, विश्‍वनाथ लक्ष्मण नन्नवरे हे चार जण मयत झाले असून विठ्ठल गणपत डोके, रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस, रोहिदास हरिभाऊ सांगळे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एसटीत प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवाशातील काहींना किरकोळ दुखापत झाली असुन सर्वजण सुखरूप आहे. बेलवंडी पोलीस व श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. मयतांचे मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी  नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. अपघात झाल्यानंतर परिसरातील भुरट्या चोरानी ईरटीका गाडी मधील नामांकित कंपनीचा साऊंड सह साहित्य पळवले असून बेलवंडी पोलीस त्यांचा तपास करत आहे.3 मे रोजी याच रोडवर पीर साहेब दर्गा शेजारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये महादेव दत्तत्रय येवले (वय 50 वर्षे) या दुचाकी स्वराच जागीच मृत्यू झाला असताना लगेच दुसर्‍यांच दिवशी हा अपघात झाला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यक फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आहे.

COMMENTS