Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडील आदेशाने जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत

दहशदवादाचे मुंबई कनेकशन
निजामाला भाडेपट्ट्याने दिलेला वुडलॉन बंगला सील
कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडील आदेशाने जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
निवडणूक विभाग गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 8 ऑक्टोंबर रोजी, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. 14 ऑक्टोंबर रोजी, निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे दि. 27 ऑक्टोंबर रोजी, मतदान केंद्राची व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिध्द करणे दि. 27 ऑक्टोबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी सातारा जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये व त्या तालुक्याच्या कार्यक्षत्रातील पंचायत समिती मधील ज्या-त्या गट व गणनिहाय यादी दि. 8 ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच 8 ऑक्टोंबर रोजीपासून गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत. सदर प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. 8 ते दि. 14 ऑक्टोंबर रोजीपर्यंत आहे. कार्यालयीन वेळेत सर्व तहसिलदार कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येतील, असे
विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळवले आहे.

COMMENTS