Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकर

सत्ता-संघर्षाच्या निकालाआधीच घडामोडींना वेग
तुमचा फौजदाराचा हवालदार केला आमची मापे कशाला काढता?
उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार-मलिक (Video)

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोळ, संतोष महाराज सुले पाटील, भालचंद्र नलावडे, तुषार भोसले, माजी आमदार योगेश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणार्‍या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून  भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते. सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,अमंगळ’ हा ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला 100 वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS