माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ

अहमदनगर/प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुचित उदगार काढल्याने नगरसेवक पद रद्द झालेला महापालिकेचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम याने एकास जातीवा

माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार
श्रीपाद छिंदमच्या विरोधात होणार दोषारोपपत्र दाखल l LokNews24
श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुचित उदगार काढल्याने नगरसेवक पद रद्द झालेला महापालिकेचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम याने एकास जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली असून, याप्रकरणी त्याच्याविरोधात तोफखाना पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीगेट येथील जागा मी खरेदी केलेली आहे, तिथे तुझा काय संबंध?, असे म्हणत या ठिकाणी असलेल्या टपरीधारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाचजणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या प्रकरणी भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली असून, आरोपींमध्ये श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे, राजेंद्र म्याना यांचा समावेश आहे. 9 जुलै 2021 रोजी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, भागीरथ बोडखे हे मजुरी करणारे कामगार दिल्लीगेट येथे ज्युस विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. गिरीश जाधव (रा.बागरोजा हडको) हे त्यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. सुमारे 5 वर्षापासून भागीरथ बोडखे ज्यूस सेन्टरचे कामकाज पाहत असून त्याच्या मोबादल्यात गिरीश जाधव हे त्यांना दरमहा 1000 रुपये पगार देतात. या ज्युस सेन्टरवर भागीरथ बोडखे यांनी दि. 9 जुलै रोजी शटर उघडून बाहेर झाडलोट करून साफसफाई केली व दुकानाचे कामकाज सुरु केले असता दुपारच्या वेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे असे त्या ठिकाणी आले व भागीरथ यांना शिवीगाळ करु लागले. त्यांच्यासोबत सुमारे 30 ते 40 लोक होते. या ठिकाणी छिंदम याने तेथे एक क्रेन व जेसीबीपण आणला होता. त्यावेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे, राजेंद्र म्याना यांनी ज्यूस सेन्टरमध्ये धुडगूस घातला व त्या ठिकाणी असलेले साहित्य त्यांनी फेकून दिले, असे बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दुकान मालक गिरीश जाधव यांना फोन करुन हा प्रकार भागीरथ यांनी सांगितला असता, त्यावेळी जाधव यांनी, मी बाहेर गावी आहे, मी लवकर येईल, असे सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर भागीरथ याने आपल्या पत्नीला व मुलाला या ठिकाणी तात्काळ येण्यास सांगितले होते. मागोमाग ज्यूस सेन्टरच्या पाठीमागील म्हस्के क्लासचा वॉचमन संतोष साठे व माझा मित्र सलिम अहमद शेख हे पण तेथे आले. त्यावेळी श्रीपाद शंकर छिंदम याने येथील भागीरथ याला, तुझे सामान उचल, ही जागा मी घेतली आहे, … शिवायचे सोडून हे काम कुठ करतो? …. लई माजला तू, असे म्हणाला. श्रीकांत छिंदम याने सुद्धा त्यास ….. माजलास का, ताबडतोब सामान बाहेर काढ, अशी जातीवाचक शिवीगाळ करुन दमबाजी केली. त्याच दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांनी, तू जर आत्ताच्या आत्ता सामान बाहेर काढले नाही, तर तुला बघून घेवू, अशी धमकी दिली व शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद करून पुढे म्हटले आहे की, त्यावेळी ज्युस सेन्टरसाठी लागणार्‍या आवश्यक सामानाचे नुकसान होवू नये, म्हणून भागीरथ यांनी त्या सर्वांना विनंती केली की, सामान नवीन घेतलेले आहे, मी काढून घेतो, मला थोडा वेळ द्या. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रतीक हा पण त्यांच्या पाया पडत होता. परंतु त्या सर्वांनी त्यांचे काहीएक न ऐकता ज्यूस सेन्टरमध्ये उरलेले सामान फेकून दिले व त्यांच्या गल्ल्यात असलेले धंद्याचे 5000 रुपये व त्यांच्या नातूला सोन्याची चेन घेण्यासाठी आणलेले 25,000 रुपये असे एकूण 30,000/- रुपये श्रीपाद शंकर छिंदम याने काढून घेतले. तसेच … व्हय बाहेर, असे म्हणून धक्के मारुन त्यांना तेथून हुसकावून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. भागीरथ, त्यांची पत्नी व मुलगा असे मागील रस्त्याने मोकळ्या जागेतून मारायच्या भीतीने निघून जात असताना श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांनी व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 लोकांनी मिळून त्यांची दिल्लीगेट ज्यूस सेन्टरची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून, तिचे पत्रे चेपून तिला तेथून उचलून मागच्या बाजूला मोकळ्या जागेत टाकून दिले व त्या ठिकाणी नवीन पत्र्याची टपरी क्रेनच्या सहाय्याने या जागेवर ठेवली. अशा एकूण 12 नवीन पत्र्याच्या टपर्‍या क्रेनच्या सहाय्याने त्या ठिकाणी परिसरात ठेवून ते सर्व लोक निघून गेले. भागीरथ यांच्या परिचयाच्या ज्या 4 लोकांनी त्यांच्या ज्यूस सेन्टरमध्ये येवून जातीवाचक शिवीगाळ केली, त्या सर्वांना माहीत होते की भागीरथ हे … जातीचे आहेत, असेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, भागीरथ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी 392, 448, 451,143,147,149, 427,504,506, अ.जा. अ.ज. 2015 चे कलम 3(1) (आर). झेड ए (इ) अशा अ‍ॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विलास ढुमे करीत आहेत.

COMMENTS