Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शिवाजी काळे यांचा गौरवग्रंथ प्रेरणादायी ः सुमतीताई घाडगे पाटील

श्रीरामपूर ः डॉ. शिवाजी एकनाथ काळे हे आमच्या तेलकुडगावचे साहित्यिक, शैक्षणिक भूषण असून त्यांच्या विषयाचा डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संपादित केलेला

स्वस्त धान्य दुकानदाराचा इतरत्र लंपास होत असलेला माल पकडला
कुंभात कोरोनाचा स्फोट , टॉपचे साधू संत कोरोनाच्या विळख्यात | ‘१२च्या १२बातम्या’ | Lok news24
वादळामुळे सोलर पॅनल भुईसपाट ; शेतकरी चिंतेत

श्रीरामपूर ः डॉ. शिवाजी एकनाथ काळे हे आमच्या तेलकुडगावचे साहित्यिक, शैक्षणिक भूषण असून त्यांच्या विषयाचा डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संपादित केलेला गौरवग्रंथ अनेकांना प्रेरणादायी ठरणारा असल्याचे मत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील यांनी व्यक्त केले.
येथील प्रकाशिका मोहिनी काळे यांनी आसरा प्रकाशनतर्फे डॉ. शिवाजी काळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी’ मराठी ग्रामीण कथा’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला, हा ग्रंथ सुमतीताई घाडगे पाटील यांना प्रदान करण्या आला, त्याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सी.एस. आरसुळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार अड, बाळासाहेब तनपुरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. अनुराधा गोरे, प्रा. राजेंद्र कात्रस, प्रा. अमोल पाचारणे, प्रा. संतोष जावळे, प्रा. गोरख खेडकर आदी उपस्थित होते. या सर्वांना डॉ. उपाध्ये यांनी पुस्तके भेट स्वरूपात दिली. सौ. सुमतीताई घाडगे पाटील यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले. संपादक डॉ. उपाध्ये यांनी डॉ. शिवाजी काळे यांच्या शैक्षणिक, साहित्यिक जीवनाचा परिचय करून देऊन गौरव ग्रंथाचे महत्त्व सांगितले. सुमतीताई घाडगे पाटील यांनी या गौरवग्रंथाच्या निर्मितीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. राजेंद्र कात्रस यांनी आभार मानले.

COMMENTS