Homeताज्या बातम्याविदेश

राम चंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती

काठमांडू : नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून राम चंद्र पौडेल निवडून आले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांचा 18,518 मतांनी पराभव

सुरक्षेचा बागुलबुवा
 ठाकरे गटाकडून नागरिकांना गाजर वाटून शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
रेल्वे अपघात रोखण्यासाठी विशेष ‘कवच’; खुद्द रेल्वेमंत्र्यांनी घेतली चाचणी | LokNews24

काठमांडू : नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून राम चंद्र पौडेल निवडून आले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांचा 18,518 मतांनी पराभव केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पौडेल यांना 33,802 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी नेम्बवांग यांना 15,518 मते मिळाली. नेपाळच्या निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली. 2008 मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर नेपाळमधील ही तिसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकीत नेपाळ काँग्रेसकडून राम चंद्र पौडेल, सीपीएन यूएमएल पक्षाकडून सुभाष चंद्र नेमबांग रिंगणात उतरले होते. गुरुवारी ल्होत्से हॉलमध्ये आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान प्रकिया पार पडली. निवडणूक आयोगानं मतदानासाठी दोन वेगवेगळे पोलिंग बूथ तयार केले होते. यामध्ये एक पोलिंग बूथ खासदारांसाठी, तर दुसरा पोलिंग बूथ आमदारांसाठी होता. सर्व विधनासभा सदस्यांनीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काठमांडूमध्ये मतदान केले. नेपाळ काँग्रेसचे उमेदवार राम चंद्र पौडेल यांचे या निवडणुकीत पारडे जड होते. त्यांना आठ पक्षांचा पाठिंबा होता. तर दुसरीकडे सीपीएन-यूएमएल पक्षाचे उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांना पक्ष वगळता फक्त दोन अपक्षांचा पाठिंबा होता. नेपाळच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये 882 सदस्य आहेत, त्यामध्ये संसदेचे 332 सदस्य आहेत. तर 550 सात प्रांतीय विधानसभेचे सदस्य आहेत. खासदाराच्या एका मतांची किंमत 79 इतकी आहे. तर आमदारांच्या एका मताची किंमत 48 इतकी आहे. अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी मते टाकली तर इलेक्टोरल कॉलेजची एकूण मते 52,786 इतकी होतात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते पडतात, तो उमेदवार विजयी होतो. नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देउबा यांनी ट्वीट केले की, माझे मित्र राम चंद्र पौडेल यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 

COMMENTS