Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 दर्यापूर येथे शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळले प्लास्टिक

अमरावती प्रतिनिधी - दर्यापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह असून या वस्तीगृहामध्ये तब्बल 75 विद्यार्थी हे राहतात.  या विद्यार्

शेतकर्‍यांच्या परवानगीनेच कृषी कायदे लागू होणार ; मंत्री सत्तार यांची ग्वाही
सरकारे बदलली तरीही डॉ. दाभोळकरांचे सूत्रधार मोकाट : डॉ. राजेंद्र माने
Sangamne r: ईद ए मिलाद निमित्त मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई| LokNews24

अमरावती प्रतिनिधी – दर्यापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह असून या वस्तीगृहामध्ये तब्बल 75 विद्यार्थी हे राहतात.  या विद्यार्थ्यांना शासनाकडून राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. मात्र आता या शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवणामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्यास आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. या शासकीय वसतिगृहामध्ये आज विद्यार्थ्यांना जेवण्यात देण्यात आलेला आहारातील पोळी मध्ये चक्क प्लास्टिक आढळून आले आहे.ही बाब विद्यार्थ्याला जेवण करताना लक्षात आल्याने सुदैवाने अनुचित घटना घडण्यात तळली 

या संदर्भात विद्यार्थ्याने वस्तीगृहातील व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली असता व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना थातूरमातूर उत्तर दिले परंतु संबंधित आहार बनवला ठेकेदारावर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित ठेकेदाराला शासनाकडून प्रत्येकी एक विद्यार्थी 3450 रुपये प्रमाणे मोबदला देण्यात येतो. या शासकीय वस्तीगृहामध्ये तब्बल 75 विद्यार्थी असून संबंधित ठेकेदाराला महिन्याला लाखो रुपये शासनाकडून देण्यात येत आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांना भोजनामध्ये अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आता या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे.

COMMENTS