Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरुरमधून डॉ. कोल्हेच लढणार लोकसभा

खा. शरद पवार यांचे शिक्कामोर्तब

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉगे्रसमधून कोण लढणार, याबाबत साशंकता होती. विरोधी पक्षनेते अजित प

’मविआ’ कोणतीही फूट पडणार नाही ः खा.डॉ. अमोल कोल्हे
संसदरत्न खा.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ॲड.प्रतापराव ढाकणे सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा सोमवारी युवा संवाद अभियानाचा समारोप
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडताना अमोल कोल्हेंचं सूचक भाष्य

पुणे/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉगे्रसमधून कोण लढणार, याबाबत साशंकता होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेरिटवरच या मतदारसंघासाठी उमेदवार देवू असे विधान करून, विलास लांडे यांना झुकते माप दिले होते. मात्र सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही साशंकता काढत शिरूरमधून लोकसभा डॉ. अमोल कोल्हेच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदर दोघात चुरस निर्माण झाली होती. त्यातच अजित पवार यांनी मेरीटचा विषय काढल्यामुळे डॉ. कोल्हे यांचा पत्ता कट होणार असे बोलले जात होते, मात्र पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातल्या निर्सग मंगल कार्यालय येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला आणि त्यावर मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी विचार विनिमय झाला. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पवार यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, पक्षांर्तगत गटबाजी रोखण्यात त्यांना यश आले आहे. याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक् पार पडली. 2019 मध्ये सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी ताकदीने निवडणूक लढविण्यास मला मदत केली. माजी आमदार विलास लांडे हे ज्येष्ठ नेते असून त्यांची साथ आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

COMMENTS