आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? शाहरूखकडून करणार होते वसूल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? शाहरूखकडून करणार होते वसूल

मुंबई- केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या पं

चिदम्बरम – फडणवीस सांस्कृतिक ऐक्य!
जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या | LokNews24
पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई

मुंबई- केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडे यांना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा या पंचाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा साळी यांनी केला आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साळी यांनी केला आहे.
अंमली पदार्थप्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडलं. यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने ही एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे. या प्रकरणात लाखोंची डील झाल्याचा दावा गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने केला आहे. क्रूझवरील छाप्यावेळी 2 ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक 1 चा साक्षीदार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कशाप्रकारे सर्वांना पकडले. याची माहिती बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने दिली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात किरण गोसावी सुरवातीपासूनच वानखेडेंसोबत होता. तसेच कशा प्रकारे आर्यन खानसह इतरांना पकडण्यात आले. याची सर्व माहिती त्याने दिली आहे. किरण गोसावी अहमदाबावरून आल्यानंतर थेट मुंबई दाखल झाला. एनसीबीच्या कार्यालयातून ते क्रूझ ठिकाणी गेले. साडेदहा पावणे अकरा वाजता क्रूझमधील अनेकांना पकडण्यात आले होते. आर्यन खानही त्यात होता. त्याला वेगळे बसवण्यात आले होते. आणखी 7 ते 8 जण तिथे होते. मी यासर्वांचे आपल्या मोबाइलमध्ये गुपचूप फोटोही काढले. किरण गोसावी आर्यन खानला घेऊन एनसीबीच्या कार्यालयात गेले, असा दावा या प्रभारकर साईलने केला आहे. पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून आपली सही कोर्‍या कागदांवर घेतली गेली. नऊ ते दहा कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या. आपल्याकडून आधार कार्ड मागितल्यावर. पण ओरिजनल आधारकार्ड नसल्याने समीर वानखेडेंनी त्यांचा नंबर दिला आणि आपण आधार कार्ड व्हॉट्सअ‍ॅप केले. त्यावेळी रात्री अडीच पावणे तीन वाजता आम्ही एनसीबीच्या कार्यालयातून खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावीना सॅम नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. एनसीबी ऑफिसपासून 500 मीटर अंतरावर एका डाव्याबाजूला त्यांची मिटींग झाली. मिटींगमध्ये त्यांची काहीतरी डील झाली, असे साही याने सांगितले. लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारात सॅम, किरण गोसावी आणि एसआरकेची मॅनेजर होती. त्या तिघांमध्ये मिटिंग झाली. यानंतर त्यानी कारमधूनच आपल्याला फोन केला ’25 कोटींचा बॉण्ड’ करायला सांगितला. त्यातील 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचेत आणि 10 आपल्याला वाटायचे आहेत, असे ते म्हणाले. पैशांसाठी आम्ही पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो. पण न मिळाल्याने आम्ही वाशीला घरी निघून आलो. यानंतर काही वेळाने लगेच किरोण गोसावीनी आपल्याला महालक्ष्मी स्टेशनजवळ ताडदेवजवळ इंडियाना हॉटेलजवळ थांबायला सांगितले. यानुसार आपल्याला एका कारमधून 50 लाख रुपये घेण्यास सांगितले. 5102 असा या कारचा क्रमांक होता, असा दावा साईलने केला आहे.

वानखेडेंना मिळणार होते 8 कोटी
या प्रकरणात शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी करण्यात येणार होती. आणि त्यात 18 कोेटीपर्यंत फायनल करण्यात येणार होते. त्यातून 8 कोटी वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट साळी यांनी केला आहे. क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावी तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

10 कोर्‍या कागदांवर सह्या
एनसीबीने 10 कोर्‍या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असेही प्रभाकर साळींनी सांगितले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साळींनी दिली आहे.

समीर वानखेडेकडून गोसावीच्या जीवाला धोका
क्रुझवरील धाडसत्राच्या रात्री आपण गोसावी सोबतच होतो. गोसावी आणि सॅम यांना एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकत्र पाहिल्याचा दावाही त्यांनी केला. गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्याने केला आहे.

COMMENTS