Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा डॉ. सुजय विखेंना जाहीर पाठिंबा

जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत मेळावा उत्साहात

राहुरी - डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व  कामगारांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत

कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
अण्णा हजारेंनी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान ऊर्जादायी ः विद्या पवळे
आमदार तनपुरेंनी केली म्हैसगाव येथील पुलाची पाहणी

राहुरी – डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व  कामगारांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्‍वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राहुरी येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरसेवक विक्रम भुजाडी, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, संचालक रविंद्र म्हसे, कामगार नेते कारभारी खुळे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.
           यावेळी बोलताना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, आम्ही कधीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात राजकारण केले नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमी कारखान्याला मदत व सहकार्य करण्याचे काम केले. कै. रामदास पाटील धुमाळ यांच्या काळात देखील बँकेची मदत मिळवून दिली होती. संस्था टिकली पाहिजे, कामधेनू जगली पाहिजे, ऊस उत्पादक सभासद व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका घेण्याचे काम केले. सभासदांनी निवडणुकीत निवडणूक दिलेल्या पॅनलला मदत करण्याचे आम्ही जाहीर केले होते त्यानुसार संचालक मंडळास मदत केली. कर्जाचे पुनर्गठन करून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना सुरू केला. कारखाना बंद कसा पडला, सुरू कोणी केला याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. काही दिवसांपूर्वी कामगारांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रश्‍नासाठी भूमिका घेतली यामध्ये खा.डॉ. सुजय विखे पाटील व आम्हाला काही चूक वाटत नाही. चार वेळा बँकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम झाले. परंतु यामध्ये कामगारांना दुर्लक्षित करून चालणार नाही अशी अट घातली होती. त्यामुळे कोणी पुढे आले नाही. मागील वेळी कामगारांनी आंदोलन केले त्यावेळी सुमारे 8.50 कोटी रुपये फंडाची रक्कम आपण बँकेच्या टॅगिंग मधून मिळवून देण्याचे काम केले.  यापुढे देखील कारखाना सुरू करण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील. तसेच कामगारांचे देणे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी भूमिका मांडताच उपस्थित सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला.

COMMENTS