Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बापये हॉस्पीटलचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा

अद्ययावत होत राहाल, तर स्पर्धेत टिकाल : अच्युत गोडबोले

नाशिक : दहा वर्षात जितकी प्रगती झालेली असून, तेवढी प्रगती मानवी इतिहासात झालेली नाही. तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढलेला आहे. अशा परिस्थितीत आपण जे

पुण्यभूमी चे मुख्य संपादक बाळासाहेब मस्के व केज प्रतिनिधी रोहण गलांडे यांच्या वरील गुन्हे माघे घ्या
मिसफायर झालेला बॉम्ब चक्क घराजवळच पुरला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नया पाकिस्तान

नाशिक : दहा वर्षात जितकी प्रगती झालेली असून, तेवढी प्रगती मानवी इतिहासात झालेली नाही. तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढलेला आहे. अशा परिस्थितीत आपण जे शिकलो, त्यावरच चिटकून राहिल्यास अशी व्यक्ती संपुष्टात येईल. स्वत:ला अद्ययावत करत राहिल्यावरच केवळ स्पर्धेत टिकणं शक्य आहे असे प्रतिपादन वैज्ञानिक विचारवंत व लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.

डॉ. बापये हॉस्पीटलच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे, डॉ. मनोहर बापये, डॉ. मीना बापये, डॉ. मनीष बापये, डॉ. चारूता बापये उपस्थित होते.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नवीन लेझर तंत्रज्ञानाचा अनावरण सोहळा यावेळी झाला. यावेळी आर्किटेक्ट सुरेश सबनीस, विवेक वैंशपायन यांच्यासह कर्मचारी ऊर्मिला पाल, शकुंतला टन्नू, वंदना पंडीत, जयकुमार विसपुते यांचा सत्कार झाला.

श्री. गोडबोले म्हणाले की, आपण गृहित धरत आहोत, त्यापेक्षा अनेक पटींनी जलद गतीने तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाला सामोरे जाण्याची तयारी नसेल तर आपण नष्ट होऊ. मानवी उत्क्रांतीनंतर कृषी व्यवसाय करताना काही शतकांमध्ये प्रगती झाली. त्यानंतर औद्योगिक क्रांती घडल्यानंतर काही शतकांमध्ये प्रगती साधली गेली. १९६० नंतर आधुनिक सेवा क्षेत्र फोफावले व अवघ्या काही दशकांमध्ये प्रगती झालेली आहे. डॉ. आगाशे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रूग्णालयातर्फे उपलब्ध करून दिलेले आधुनिक तंत्रज्ञान रूग्णांना दिलासा देणारे ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

डॉ. मीना बापये म्हणाल्या, की वकीलवाडीपासून छोट्या क्लिनिकचा सुरु झालेला प्रवास आज सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी आय क्लिनिकपर्यंत झाला आहे. इमारतीने हॉस्पीटल होत नसून तेथे उपलब्ध होणार्‍या तंत्रज्ञानाचा रूग्णहितासाठी उपयोग झाला पाहिजे, हीच भूमिका घेत नेहमी अद्ययावत सुविधा देण्यावर भर राहिला आहे. डॉ. मनीष बापये म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मोतीबिंदूचा त्रास असलेल्या आजोबांना थोडेफार दिसावे, अशी अपेक्षा असायची. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेनंतर आजोबांना नातवापेक्षा स्पष्ट दिसायला लागले आहे. अपर्णा वेलणकर यांनी मनोगत व्यक्तकेले. सुत्रसंचालन डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने बापये यांचा मित्र परिवार व रूग्ण उपस्थित होते.

COMMENTS