मिसफायर झालेला बॉम्ब चक्क घराजवळच पुरला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिसफायर झालेला बॉम्ब चक्क घराजवळच पुरला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील केके रेंज येथून मिस फायर झालेल्या बॉम्बची चोरी करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्याती

कनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळासाहेब गाढे  
अखेर कचरा डेपोचे कुलूप पालिकेनेच तोडले
“त्या’नऊ जणांची सामूहिक आत्महत्या नसून हत्या दोन मंत्रिकांना अटक | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील केके रेंज येथून मिस फायर झालेल्या बॉम्बची चोरी करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील खारेकर्जूने शिवारातील केके रेंज लष्करी प्रशिक्षण हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन दोघांनी मिस फायर झालेला बॉम्ब चोरुन नेऊन लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने घराशेजारील शेतात पुरुन ठेवल्याची घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.
याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील खारेकर्जूने येथील केके रेंज आर्मी प्रशिक्षण क्षेत्र येथे बिंदू सरावादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा भाग नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. असे असताना या क्षेत्रात दोघांनी नजर चुकवून प्रवेश केला आणि आतील सुमारे तीन महिन्यापूर्वी युद्ध सरावादरम्यान मिस फायर झालेला बॉम्ब चोरुन नेला. ही घटना दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिलच्या सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या बॉम्बची विल्हेवाट लावण्याअगोदर हा बॉम्ब दोघांनी लोकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशा रीतीने घराशेजारील शेतात पुरून ठेवला. याबाबतची माहिती मिळाल्याने तात्काळ त्या दोघांवर कारवाई करून त्यांनी पुरून ठेवलेला मिसफायर झालेला बॉम्ब हस्तगत करण्यात आला. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अमित संतोष गोंधळे व जय राम चौधरी (दोघे राहणार ढवळपुरी, पारनेर) अशी सांगितली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एलडी आर्मी नंबर 15492121 बंडू उत्तम येणारे (वय 38, के के रेंज, राहणार रायतळे, तालुका पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 379, 286, 336, 34 सह मुंबई पोलीस कायदा कलम 120 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक गांगर्डे करीत आहेत.

मोटार केबल, कंट्रोल सेंसरची चोरी
केके रेंज येथील स्टोअरमधून मोटार केबल, कंट्रोल सेंसरची चोरी झाली आहे. केके रेंजमधील स्टोअररूम मध्ये असलेली एक लाख 85 हजार रुपये किमतीची महिंद्रा मोटार केबल व कंट्रोल सेंसर कोणीतरी अज्ञात चोराने स्टोअररूमचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरून नेली. या प्रकरणी छोटूराम दफेदार (वय 38, राहणार विंग स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी सेंटर अहमदनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार पवार करीत आहे.

COMMENTS