Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारत-कॅनडा संबंधात वितुष्ट

खरंतर जगात दहशतवादाच्या सर्वाधिक झळा जर कोणत्या देशाला अनुभवाला मिळायला असेल तर, त्या भारताला. एकेकाळी भारताचा अविभाज्य घटक असणारा पाकिस्तान आज स

तापमानवाढीचे संकट पेलतांना …
कॅगच्या अहवालातून होणार ठाकरे गटाची कोंडी ?
साहित्यिकांचा रोष आणि पुरस्कार वापसी

खरंतर जगात दहशतवादाच्या सर्वाधिक झळा जर कोणत्या देशाला अनुभवाला मिळायला असेल तर, त्या भारताला. एकेकाळी भारताचा अविभाज्य घटक असणारा पाकिस्तान आज स्वतंत्र देश आहे. मात्र भारताचा अविभाज्य घटक असणारा हाच देश आपल्या शेजारी राष्ट्राशी लढतांना दिसून येत आहे. भारत-पाकिस्तानचे उदाहरण द्यायचे कारण म्हणजे कॅनडा सरकार आज खलिस्तानी दहशतवाद्यांच्या जीवांची काळजी करतांना दिसून येत आहे, शिवाय भारतावर गंभीर आरोप करत असल्यामुळे भारत देश दहशतवादाने पीडित देश असल्याचे सांगावे लागत आहे. कॅनडा हा देश नेहमीच खलिस्तानी दहशवाद्यांना आश्रय देत आला आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली. ही हत्या जून 2023 मध्ये झाली. पण या प्रकरणात भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने सप्टेंबर 2023 मध्ये केला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हा आरोप केला. यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अशाच स्वरुपाचा आरोप केला. खरंतर हरदीपसिंग निज्ज्जरवरून त्या कॅनडाने आकंडतांडव सुरू केले आहे, त्या हरदीपसिंगचा जन्म पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात 1977 मध्ये जन्म झाला. पंजाबमधून पूर्वापार कॅनडामध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक आहे. कॅनडामध्ये शीख समुदायाची संख्या देखील मोठी आहे. आणि आताही तेथे हा समाजघटक प्रभावी ठरतांना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, कॅनडाच्या पंतप्रधानपदी देखील आगामी काही वर्षांमध्ये शीख व्यक्ती दिसली तर नवल वाटायला नको. याच प्रभावामुळे हरदीपदेखील 1997 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरीत झाला. तिथे सुरूवातील प्लंबर म्हणून काम करणार्‍या हरदीपचा नंतर ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानवादी संघटनेशी संबंध आला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स, अर्थात ‘आयएसआय’ने सुरुवातीपासून ‘बब्बर खालसा’ला बळ दिले आहे. भारताने ‘बब्बर खालसा’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून तिच्यावर बंदी घातली आहे. हरदीप नंतर ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा प्रमुख बनला. व्हॅँकुअरचे उपनगर असलेल्या सरे येथील गुरुद्वारात राहून तो भारतविरोधी कारवाया करायचा. अगदी अलीकडे तो या गुरुनानक गुरुद्वाराचा प्रमुख म्हणून निवडूनही आला होता. एका हिंदू पुजार्‍याची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. अशा या हरदीपची हत्या झाल्यानंतर कॅनडा चवताळून उठला आहे. आणि त्यांच्याकडून नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी, ते स्वतःच्या पायावरच धोंडा पाडून घेतांना दिसून येत आहे. खरंतर या व्यक्तीसाठी कॅनडा इतका आक्रेस्ताळेपणा का करत आहे, तर त्यांचे राजकीय गणित बिघडतांना दिसून येत असल्यामुळेच. कारण शिखांचा या प्रदेशात प्रभाव आहे. त्यामुळे कॅनडा इतका आक्रस्ताळेपणा करतांना दिसून येत आहे. एवढ्यावरच न थांबता कॅनडाने भारताच्या राजनैतिक अधिकार्‍याला परत पाठविण्याचा निर्णयही घेतला. भारताची डोकेदुखी असलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना कॅनडा कायमच आश्रय देत आलेला आहे. त्यामुळे भारताचे त्या देशाशी संबंध नेहमीच काहीसे तणावाचेच राहिले आहेत. आताच्या आतातायी कृतीने त्या देशाने भारतासोबतचे संबंध पार बिघडवून टाकले आहेत. याचा परिणाम म्हणून भारत-कॅनडा यांच्यात होऊ घातलेला मुक्त व्यापार करारही भारताकडून स्थगित करण्यात आला आहे.  वास्तविक पाहता जग दहशतवादाविरोधात लढत असतांना कॅनडा सरकार खलिस्तानी दहतशवाद्यांच्या जीवाची काळजी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे कॅनडा आता खलिस्तानी दहशतवाद्यांच्या जीवांची काळजी करतांना दिसून येत आहे. भारत सरकारने कॅनडाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतात लोकशाही आहे. एक जबाबदार लोकशाही व्यवस्थेत काम करणारा आणि मानव कल्याणाचा विचार करणारा देश दुसर्‍या देशात जाऊन हत्या करण्यासारखे बेजबाबदार वर्तन करत नाही. कॅनडाचे आरोप हे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत; अशा स्वरुपाचे उत्तर भारताकडून देण्यात आले. 

COMMENTS