Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोगटेक, खुडुपलेवाडी ग्रामस्थांना निरचक्राचे वाटप

पाटण / प्रतिनिधी : विकास चारिटेबल ट्रस्ट पुणे, ट्री इनोव्हेटीव फाऊंडेशन पुणे व श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने वनकुसव

इंधन दरानंतर खाद्य तेलांच्या किंमतीत घसरण
कवठेत ड्रोनव्दारे औषध फवारणी ; ग्रामीण शेतकर्‍यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

पाटण / प्रतिनिधी : विकास चारिटेबल ट्रस्ट पुणे, ट्री इनोव्हेटीव फाऊंडेशन पुणे व श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने वनकुसवडे पठारावरील गावडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या जोगटेक, खुडुपलेवाडी गावांतील कुटूंबांना निरचक्राचे वाटप करण्यात आले. निरचक्र वाटपाचा कार्यक्रम गावडेवाडी येथे संपन्न झाला.
श्रमजीवी सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर म्हणाले, नवीन पिढीतील तरूणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील लोकांसाठी केला आहे. ग्रामीण भागाचा सार्वंगिण विकास होण्यासाठी तंत्रज्ञानाची खुप गरज आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ग्रामीण भागाचा विकास करू शकतो. ट्री इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनच्या इंजिनियर गृपचे त्यांनी यावेळी कौतूक करून उपस्थित ग्रामस्थांना निरचक्राचा वापर करण्याचे आवाहन केले.
ट्री इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनचे तन्वीर इनामदार यावेळी बोलताना म्हणाले, निरचक्राच्या मदतीने गावातील महिलांना झर्‍याचे पाणी डोक्यावरून आणण्याचा त्रास संपणार आहे. निरचक्राच्या मदतीने झर्‍याचे एकाच वेळी 60 लिटर पाणी चक्रातील पिंपातून आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे महिलांचे वेळ व श्रम कमी होणार आहे. नीर चक्राच्या देखभाल दुरुस्तीबाबत तीन महिन्यांनी एक प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. जेणेकरून नीर चक्राच्या माध्यमातून पाणी वाहून नेणे सोईचे होणार आहे.
विकास चारीटेबल ट्रस्टचे सोडी यांनी या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या कार्यक्रमासाठी गावडेवाडीच्या सरपंच हौसाबाई ताटे, पाटण तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक, माजी सरपंच धोंडीराम ताटे, ग्रामसेवक एस. आर. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व आभार धोंडीराम ताटे यांनी मानले.

COMMENTS