Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला

चितपट कुस्त्यांना मिळाली टाळ्या-शिट्ट्यांची दाद
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात बाळासाहेबांची शिवसेना यांच्याच शिवसेनेचाच विजय होईल – रावसाहेब दानवे
स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अंधारात लाईट सुरु करायला जात होते, त्यावेळी त्यांचा पाय घसरला, ते पडले आणि त्यांना दुखापत झाली. दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः एक्स पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन. अशी पोस्ट दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

COMMENTS