Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुटखा बंदी नावालाच; पाटण शहरात खुलेआम विक्री

पाटण / प्रतिनिधी : राज्यात गुटख्याच्या साठा व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील पाटण शहरात बाजारपेठ व आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही मोठ

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ. चंद्रकांत पाटील
पाटण बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करून कडक शिक्षा द्यावी

पाटण / प्रतिनिधी : राज्यात गुटख्याच्या साठा व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील पाटण शहरात बाजारपेठ व आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री छुप्या पद्धतीने केली जात आहे.
राज्य महामार्गावर सर्रासपणे गुटख्याची वाहतूक सुरू असते. संबंधित अन्न व औषध प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून गुटखा तस्करी करणार्‍या विक्रेत्यावर किरकोळ कारवाई होत असली तरी तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात अनेक पानटपर्‍या व हॉटेलवर खुलेआमपणे गुटखा विकला जात आहे. त्यामुळे तालुक्यात गुटखा बंदी सध्या तरी कागदोपत्री असल्याचे दिसत आहे.
गुटख्याची पुडी कंपनीच्या किंमतीपेक्षा अधिक दराने विकली जात आहे. तीन ते पाच रुपयांची पुडी 6 ते10 रूपयाना विकली जाते. विक्री करणारे गुटख्याचा साठा अन्य ठिकाणी करतात. काही गुटखा विक्रेत्यांनी शासनाच्या गुटखाबंदीचा लाभ घेत गुटख्याची किंमत वाढवली आहे. गुटखा खणारांना गुटखा विक्रीची ठिकाणे सापडतात. मात्र, पोलिसांना किंवा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना अपवाद वगळता त्याचा थांगपत्ता लागत नाही. हे एक कोडेच आहे.

COMMENTS