Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’पासष्टी’ सारखी पुस्तकनिर्मिती माणुसकीची संस्कृती ः लेविन भोसले

श्रीरामपूर ः अकोले येथील ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी कुमावत यांनी आपल्या दोन जीवलग साहित्यिक मित्रांचा गुणगौरव करण्याच्या आत्मजिव्हाळ

LokNews24 l लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल, शिवसेनेची टीका
ना. थोरात यांच्या पाठपुराव्यातुन तालुक्यात 5 मेगाहोल्ट पावर ट्रांसफार्मर मंजूर
जनसामान्यांचा विकास हेच माझे ध्येय ः आमदार मोनिकाताई राजळे

श्रीरामपूर ः अकोले येथील ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी कुमावत यांनी आपल्या दोन जीवलग साहित्यिक मित्रांचा गुणगौरव करण्याच्या आत्मजिव्हाळ्याने ’पासष्टी’ सारखा दीर्घकवितासंग्रह प्रकाशित केला ही माणुसकीची मैत्रीपूर्ण संस्कृती असल्याचे मत प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष साहित्यिक लेविन भोसले यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील गुरुनानकनगर मधील साहित्य प्रबोधन मंचतर्फे पुंडलिक गवंडी यांच्या ’पासष्टी’ या पुस्तकावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या प्रकाशन सोहळ्यात  त्यांनी पुस्तकाचे वेगळेपण सांगितले तर साहित्य प्रबोधन मंचच्या परिसंवादात त्यांनी चर्चात्मक मत मांडले, त्यावेळी लेविन भोसले बोलत होते. आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मोहिनी काळे यांनी स्वागत करून उपक्रमाचे नियोजन केले. साहित्य प्रबोधन मंचचे  अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांनी प्रास्ताविक केले. स्नेहपरिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, कार्याध्यक्ष प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त करून साहित्य प्रबोधन मंचच्या पुस्तक परिसंवादाची चर्चा केली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुंडलिक गवंडी यांच्या ’पासष्टी’ चरित्रपर दीर्घकविता निर्मितीविषयी आनंद व्यक्त केला. लेविन भोसले आपल्या चर्चेत पुढे म्हणाले की, मित्रांविषयी  शब्दभावना व्यक्त करणे ही आज च्या जागतिकीकरणाची, तंत्रयुग धावपळीच्या काळाची गरज आहे. माणूसच माणसांच्या सहवासाने आणि संवादाने माणुसकीची नाती निर्माण करतो. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्याशी माझी अकरावी विज्ञान वर्गमित्र म्हणून मैत्री आहे. त्यांच्या सहवासातून मी साहित्य चळवळीत व साहित्य निर्मितीच्या माध्यमातून गतिशील झालो, ’पासष्टी’ मध्ये डॉ. उपाध्ये आणि गोवा येथील अवधूत शिरोडकर यांच्या चरित्रवेध घेणार्‍या दोन दीर्घकविता लिहिल्या आहेत,त्या    हृदयस्पर्शी आहेत. त्याबद्दल पुंडलिक गवंडी यांचे विशेष कौतुक,अभिनंदन आहे. अशीच माणुसकीची कार्यशाळा वाढली तर जग समाधानी होईल. आसरा प्रकाशनतर्फे आपलेही पुस्तक लवकरच प्रकाशित होत असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. शिवाजी काळे यांनी आभार मानले.

COMMENTS