श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून शेतीचे आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने उपलब्ध न झाल्यास शुक्रवार (ता. 2

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून शेतीचे आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने उपलब्ध न झाल्यास शुक्रवार (ता. 24) रोजी सकाळी 10.00 वा. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. तथापी, धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नाही. सबब मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे भरणे होवू शकणार नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही उभी पिके करपण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. वरील बाब लक्षात घेवून श्रीरामपूर भागात प्रवरा डाव्या कालव्यांना तातडीने पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात यावे. जेणेकरुन उभ्या पिकांचे भरणे होईल. सदरची कार्यवाही गुरुवार दिनांक 23 मे पर्यंत करण्यात यावी. अन्यथा शुक्रवार 24 मे रोजी सकाळी 10.00 वाजता श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल. तसेच मागणी पूर्ण होईपर्यंत कार्यालयास घेरावो करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS