Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुधनगाव येथील अवैध रेती माफियावर गुन्हे दाखल करुन अटकाव करण्याची मागणी

परभणी प्रतिनिधी - मौ.दुधनगाव येथील अवैधन रेती माफियावर गुन्हे दाखल करून त्यांना प्रतिबंद करण्यासाठी दि.18 रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात

मुख्य निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळले ?
महिलांनी मणके विकार टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक : डॉ. विशाल गुंजाळ
मांगरूळ येथील मैदानात पै. सिकंदर शेखची बाजी; चिंचेश्‍वर यात्रेनिमित्त कुस्ती मैदान पडले पार

परभणी प्रतिनिधी – मौ.दुधनगाव येथील अवैधन रेती माफियावर गुन्हे दाखल करून त्यांना प्रतिबंद करण्यासाठी दि.18 रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. दुधना नदी पात्रातील ज्याचा सर्वे नं. 40, 69, 112, 114 या सर्वे नंबर मधील रेती रात्री 10.00 ते पाहटे 5.00 वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टर द्वारे व गाढवा द्वारे वाहतुक करण्यात येत आहे. तसेच अवैध माफिया हे ज्या रस्त्यातुन वाळु वाहतुक होते त्या रस्त्यावर मोटार सायकल व फोर व्हिलर घेऊन जवळ धार-धार हत्यार बागळुन लोकेशन देण्यासाठी थांबतात. या विषयी तक्रार केल्यास, तक्रार धारकास पोलीसांच्या सहकार्याने खोटे गुन्हे दाखल करुन भैयभित करण्याचा प्रकार चालु आहे. या अवैध रेती बाबत दि.18/04/2023 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, परभणी यांना तक्रार केली असता बोरी पोलीस ठाण्यास कार्यवाही करण्यासाठी कसलेच आदेश निर्गमित करण्यात आले नाही. अवैध रेती उपसा चालु असल्याची माहिती किंवा फोन केल्यास बोरी पोलीस ठाणे, अवैध रेती माफियांना त्या फोनची माहिती देऊन कळविण्याचे कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे तक्रार धारकास जिवे मारण्याच्या धमक्या वाळु माफिया कडुन देऊन भैयभित कण्याचे काम चालु आहे. रात्र-दिवस अवैध रेती उपसुन नदी पात्रातील पाण्याच्या पातळीचा समतोल बिगडुन नैसर्गिक समतोल बिगडवणार्‍या रेती माफियावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी तहसिलदार जिंतुर व पोलीस ठाणे बोरी यांना तात्काळ आदेश देऊन वाळु माफियावर गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन होणारा वाळु उपसा यास प्रतिबंध घालण्याची कार्यवाही करण्याची तक्रार कपिल नागनाथ जाधव रा. दुधनगाव ता.जिंतुर जि. परभणी यांनी दिली आहे.

COMMENTS