परमबीरविरोधात दहा कोटीची लाच मागितल्याचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमबीरविरोधात दहा कोटीची लाच मागितल्याचा आरोप

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या
पो. नि. प्रताप दराडे यांच्या नियुक्तीची राहूरीकरांनी केली मागणी
पुणेकरांनी भरला 1520 कोटींचा मिळकतकर

मुंबई / प्रतिनिधीः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान याने हे आरोप केले. सोनूने स्वतः गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाऊन आपला जबाब नोंदवला आहे.  

गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी) कडे नोंदवलेल्या जबाबानुसार, एखाद्या मोठ्या प्रकरणात जर अटक टाळण्याची असेल तर माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असे परमबीर यांनी मला सांगितले होते, असे सोनूने म्हटले आहे. या प्रकरणी परमबीर आणि प्रदीप शर्मा या दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आहे. जालान याने परमबीर, शर्मा आणि पोलिस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केले. या आरोपांची सध्या सीआयडी चौकशी करत आहेत. आपल्या निवदेनात जालान यांनी सीआयडी अधिकार्‍यांना सांगितले, की मे 2018 मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ‘अँटी-एक्स्टॉर्शन सेल’ ने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर यांच्याकडे नेण्यात आले होते. जालान याने दावा केला, की परमबीर यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणार्‍यांची माहिती विचारली. तसेच मला कुटुंबीयातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर शर्मा यांना दहा कोटी देण्यास सांगितल्याचा आरोप जालानने जबाबात केला आहे.

COMMENTS