Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देगलूर पालिकेच्या नगराध्यक्षपदी  विजयामाला टेकाळे, उपनगराध्यक्षपदी अ‍ॅड.अंकुश देगावकर विराजमान

राष्ट्रवादी काँग्रेसची देगलूर नगरपालिकेवर एकहाती सत्तादेगलूर । प्रतिनिधीदेगलूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित कर

मतदान करून लोकशाहीचे राजा व्हा : देडगावकर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसची देगलूर नगरपालिकेवर एकहाती सत्ता
देगलूर । प्रतिनिधी
देगलूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित करत शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ. विजयामाला बालाजी टेकाळे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, तर उपनगराध्यक्षपदी अ‍ॅड. अंकुश देसाई देगावकर यांची निवड झाली आहे.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह तब्बल 15 जागांवर विजय मिळवत आपले संख्याबळ ठोसपणे सिद्ध केले. या पार्श्वभूमीवर  आयोजित विशेष सभेत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. मान्यवरांची उपस्थिती, विकासाचा निर्धार या पदग्रहण सोहळ्यास आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन हाच आगामी कार्यकाळाचा केंद्रबिंदू असेल, असा विश्वास व्यक्त केला. 28 वर्षांनंतर देसाई घराण्याचे उपनगराध्यक्षपदी ‘कमबॅक’ देगलूरच्या नगरपालिका राजकारणात देसाई कुटुंबाचा ठसा इतिहासात कोरलेला आहे. सन 1997 मध्ये दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ सुरेशराव जयवंतराव देसाई यांनी उपनगराध्यक्षपद भूषवून प्रशासनावर कायदेशीर पकड, अभ्यासू नेतृत्व आणि नीतिमान राजकारणाची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा वैचारिक वारसा आजही देगलूरच्या राजकारणात जिवंत आहे. त्याच वारशाचा झेंडा खांद्यावर घेत युवा नेते अ‍ॅड. अंकुश देसाई देगावकर यांनी सलग चार टर्म नगरसेवक म्हणून केलेली दमदार कामगिरी, जनतेशी असलेली घट्ट नाळ आणि नगरहितासाठी घेतलेले ठाम निर्णय आज निर्णायक ठरले. तब्बल 28 वर्षांनंतर देसाई कुटुंबाला पुन्हा उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणे म्हणजे हा केवळ पदभार नाही, तर राजकीय सातत्य आणि जनतेच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे. पित्याने रोवलेला राजकीय दीपस्तंभ पुत्राने पुन्हा उजळवत देगाव गावाचा मान उंचावला असून ही पिता-पुत्रांची परंपरा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. स्वीकृत सदस्यांची निवड पक्षीय संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संतोष मधुकर नारलावार आणि सय्यद मोहियोध्दीन यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे. देगलूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सत्तेची सूत्रे हातात घेतली असून, आता शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी रास्त अपेक्षा देगलूरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

COMMENTS