Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसींच्या प्रश्नाला दुर्लक्षित करणारे पक्षांतर !

लोकसभा निवडणुका सुरू असताना, राजकीय घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचे प्रमाण निवडणूक काळात नेहमीच वाढते; तर, विरोधीपक

लॅटरल एन्ट्रीची माघार !
गांधींच्या खुन्याचा जयजयकार?
ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 

लोकसभा निवडणुका सुरू असताना, राजकीय घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचे प्रमाण निवडणूक काळात नेहमीच वाढते; तर, विरोधीपक्ष हा आपला पक्ष अधिक फिल्टर करून घेण्याचीही प्रक्रिया या काळात करत असतो. काँग्रेस सोडून जाण्याची घोषणा आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे माहिती गौरव वल्लभ या काॅंग्रेसच्या माजी प्रवक्त्याने दिली. या घटनेला प्रसार माध्यमांनी एक मोठे स्वरूप दिले. गौरव वल्लभ यांनी काँग्रेस का सोडली, याची तीन कारण सांगितली आहेत. गौरव वल्लभ यांच्यासाठी आजचे हे दखल लिहीत नाही, तर, त्यांनी दिलेली तीन कारणे,  ओबीसी समाजासाठी फार महत्त्वाची आहेत. त्यांनी पहिलं कारण दिल की मी दररोज सनातन धर्माच्या विरोधात घोषणा देऊ शकत नाही, मी देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योजकांना दररोज शिव्या देऊ शकत नाही आणि जातनिहाय जनगणना ची मागणी होत असताना राम मंदिर च्या उभारणीच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहणाऱ्या पक्षापासून दूर होण्याची भूमिका घेत आहे, ही ती तीन कारणे आहेत. वास्तविक, सनातन धर्म हा तसे पाहिला तर यावर अनेक चर्चा आपल्या देशात वारंवार होत असतात. याचे उगम स्थान नेमके कुठे आहे? यावरही धार्मिक, तात्विक आणि आध्यात्मिक संत महापुरुषांनी, तत्वज्ञांनी आपले विचार वेळोवेळी व्यक्त केले आहेत. या देशाचा ओबीसी समुदाय हा धार्मिक आहे.

अध्यात्मिक आहे, परंतु, तो धर्मांध नाही. सनातन या संकल्पनेला अलीकडे जे रूप आले आहे, ते केवळ धर्मांध असल्यासारखे रूप आहे. त्यामुळे ही संकल्पना न जोपासणारा माणूस हा जातीव्यवस्थेच्या क्रमिक असमानतेला जोपासणारा नसला पाहिजे. दुसरा, या देशाच्या जनतेने शासन व्यवस्थेला आपला कर देऊन त्यातून जी संपत्ती निर्माण होते, देशाची ती संपत्ती, या देशातील फक्त बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे संचित होत आहे. अशावेळी देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. कालच आलेल्या आकडेवारीनुसार आयआयटी या उच्च तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक संस्थेमधून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांना ३६ टक्के बेरोजगारी अनुभवावी लागते आहे. जी आयआयटी जगाच्या पाठीवर सर्वोच्च तंत्रज्ञानात्मक शिक्षण संस्था म्हणून गणली जाते, त्यांचे प्लेसमेंट  प्रीमायसेस सोडण्याच्या आत होते; अशा या उच्च तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये, जर अशा प्रकारची बेरोजगारी असेल तर, या देशातील संपत्ती निर्माते म्हटले जाणारे उद्योजक जगाच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दुसऱ्या स्थानावर येत असताना भारतीय तरुणांमध्ये बेरोजगारी का वाढते आहे? हा प्रश्न महत्त्वाचा होतो. त्याचबरोबर जातनिहाय जनगणना या देशातल्या ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे ती देशातल्या प्रत्येक जातीसाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण, स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्या जातीला देशाच्या सार्वजनिक संसाधनातून काय हिस्सा मिळाला आणि त्या त्या जातीला प्रगतीच्या कोणत्या टप्प्यापर्यंत जाता आले, हे अगदी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गौरव वल्लभ यांनी उचललेले हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. परंतु, त्यांनी या मुद्द्यांवरून काँग्रेस सोडली, असं सांगत आहेत. म्हणजे जे उद्योजक देशाची सार्वजनिक मालमत्ता लुटत आहेत, त्यांच्या विरोधात बोलायचं नाही, जी धर्म व्यवस्था या देशातील ओबीसींना केवळ संरक्षक फळी म्हणून वापरते, अशा धर्माच्या मालकांच्या विरोधातही बोलायचं नाही आणि या देशात जातनिहाय जनगणने शिवाय या देशातील बहुसंख्य समाज अन्यायग्रस्त होऊन खितपत पडला आहे, त्या विरोधातही आवाज उठवायचा नाही, असं जर गौरव वल्लव यांना वाटत असेल तर, त्यांनी निश्चितपणे पक्ष बदल केला तरी भारतीय राजकारणाच्या मध्यवर्ती भूमिकेत त्यांचं राहणं हे सामाजिक अन्यायाला निमंत्रण देण्यासारखे आहे. यात वाद असण्याचे कारण नाही

COMMENTS