Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील शिवसेनेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा-राजेश कदम

येणार्‍या सर्व निवडणूकीत जिल्ह्यात भगवाच दिसणार-खांडे

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्याने नेहमीच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम केलेले आहे. शिवसेना पक्ष बीड जिल्ह्यात मोठ्या ताक

रेखा जरे हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.| माझं गावं माझी बातमी | LokNews24 |
दिल्ली येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मरणार्थ
बोगस बि-बियाण्यांसह खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्याने नेहमीच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम केलेले आहे. शिवसेना पक्ष बीड जिल्ह्यात मोठ्या ताकदीचा राहिलेला आहे.राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत जिल्ह्यात  पक्षाला नवीन उभारी आणि गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने, पदाधिकार्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी असे आवाहन पक्ष निरीक्षक राजेश कदम यांनी केले. तर या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, बीड जिल्ह्यात शिवसेना पक्षच नंबर एकवर राहिल यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करुत. येणार्या काळात होणार्या सर्व निवडणूकांमध्ये बीड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकेल असा शब्द जिल्हाप्रमुख खांडे यांनी दिला.
शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी बीड येथील हॉटेल अन्विताच्या सभागृहात शिवसेना पक्ष निरीक्षक राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकार्यांची आढावा बैठक घेण्यात आली. प्रसंगी माजी मंत्री सुरेश नवले, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,जेष्ठ नेते सुधीरभाऊ काकडे,उपजिल्हाप्रमुख जयसिंग चुंगडे,  उपजिल्हाप्रमुख गणेश उगले, परमेश्वर तळेकर व तालूकाप्रमुख संतोष घुमरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रत्नमालाताई आंधळे,जिल्हा संघटक अलकाताई डावकर,सुमन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  या प्रसंगी पक्ष निरीक्षक राजेश कदम म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे बीड जिल्ह्याचे विशेष लक्ष आहे. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सर्वच पदाधिकारी दमदारपणे काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून शिवसेना पक्ष जिल्ह्यात वाढीस लागला आहे. परंतु सर्वसामान्यांना शिवसेना पक्ष आपला वाटण्यासाठी पदाधिकार्यांनी अधिक परिश्रम घेण्याची गरज असल्याचे कदम म्हणाले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, ग्रामीण भागात शिवसेनेला अधिक मजबुत करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याची गरज आहे. शहरी भागात तर शिवसेना सर्वात जास्त मजबूत पक्ष आहे.  ग्रामीण भागातील जनता सुध्दा शिवसेनेसोबतच आहे. परंतु पक्षाला अधिक ताकद येण्यासाठी शिवसैनिकांनी गावपातळीवर सक्रिय होऊन संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज  महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना आणल्या आहेत. शिवसैनिकांनी त्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य शिवसैनिक करत आहेत.शिवसेनेकडे ग्रामीण भागातील युवकांचा ओढा हा आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे व्यासपीठ लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी निर्माण करुन दिले आहे. येणार्या काळात बीड जिल्ह्यात शिवसेना पक्ष क्रमांक एकवर राहण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करु असे आश्वासन  जिल्हाप्रमुख खांडे दिले.तसेच गेवराई विधानसभा उपजिल्हाप्रमुख शेख एजाज,शिरुर तालूकाप्रमुख सुनिल सोनवणे,युवा सेना जिल्हाप्रमुख अजय सुरवसे, आष्टी तालूकाप्रमुख कुमार शेळके,युवा सेना उपजिल्हाप्रमुख पांडूरंग गवते,गेवराई तालूकाप्रमुख परमेश्वर बेदरे, युवा सेनेचे गेवराई तालूकाप्रमुख साहिल देशमुख,राजुरी नवगण गटप्रमुख गोवर्धन काशिद,शिवसेनेचे जिल्हा समन्वयक कृष्णा फरताळे,महिला शहरप्रमुख श्रुती ताई डांगे,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष घुमरे, परमेश्वर बेदरे, कुमार शेळके, सुनील सोनवणे,जिल्हा संघटक – गौतम नाईकवाडे देवराव आबा घोडके,तालुका संघटक – लक्ष्मण नवले, ाकासाहेब जाधव,उपतालुकाप्रमुख विकास गवते, बाबुराव खांडे, तुकाराम धनगुडे,बीड जिल्हा प्रवक्ते – बाळासाहेब मस्के,अविनाश पुजारी, गणेश जगताप, गोवर्धन काशीद सर, बालाजी गवते, सुदर्शन मोरे, प्रदीप शिंदे, राजेश शिंदे, चंद्रसेन चव्हाण, शहाजी इथापे, लहू खांडे, दीपक भांबे, करण सांगुळे, रईस भाई शेख, रामचंद्र लाटे, सखाराम सालपे, बापूराव नवले, बापूसाहेब माने, अर्जुन बहीवाळ, रमेश शिंदे, पोपट दराडे, आबेरखान पटेल,बीड शहर संघटक शेख सलीम कटू, मोमीनपुरा विभाग प्रमुख शेख नदीम,उपशहरप्रमुख नसीर खान, लिंबागणेश गणप्रमुख प्रदिप शिंदे, पाली गणप्रमुख बापू नवले, चर्हाटा गणप्रमुख राजेंद्र शिंदे,बहिरवाडी उपविभाग प्रमुख रंजीत कदम, संदिप सोनवणे,उपतालूकाप्रमुख विकास गवते, बहिरवाडी सर्कल प्रमुख समीर बेग,जिल्हा संघटक देवराव घोडके, ढेकणमोहा पं.स.गणप्रमुख गणेश जगताप,राजाभाऊ नवले, तालूका संघटक काकासाहेब जाधव,सखाराम डोईफोडे,पिंपळनेर गटप्रमुख गणेश डोईफोडे,बबन सिरसट, गजेंद्र बेद्रे आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS