अखेर लालपरी धावली; संपानंतर 151 एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर लालपरी धावली; संपानंतर 151 एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप निवळतांना दिसून येत आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात भरघोस वाढ केल्यानंतर देखील

नगरच्या वकिलाला दिला राजकारणातील शिवाजी पुरस्कार
बाजार समिती उपसभापतीपदी सविता तुंगार बिनविरोध 
लसीकरणाच्या प्रश्‍नांवर आयुक्त व महापौर निरुत्तर ; मनपाच्या महासभेत वादावादीही रंगली

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप निवळतांना दिसून येत आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात भरघोस वाढ केल्यानंतर देखील जोपर्यंत महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही, तापर्यंत संप मागे घेणार नसल्याची घोषणा कर्मचार्‍यांनी केली होती. मात्र महामंडळाने कारवाईचा बडगा उचलताच शुक्रवारी अनेक कर्मचारी कामांवर हजर झाल्याचे पहायला मिळाले. सकाळपासून राज्यात 151 एसटी गाड्या धावल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातही अंतर्गत परिवहन व्यवस्था ही एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे या जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे वसई आगारातून पहिली बस गाडी बाहेर पडली. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला. संपकाळात जे कर्मचारी संपकाळात कामावर हजर नव्हते, त्यांच्या पगाराचं काय? याबद्दल विचारणा झाली असता परब म्हणाले की, कामगार न्यायालयाने जर संप बेकायदेशीर ठरवला, तर अशी तरतूद आहे की एका दिवसाला आठ दिवसांचा पगार कापावा लागतो. कामगारांनी या सगळ्याचा विचार करावा. राज्य शासनाची अशी कोणतीच इच्छा नाही की, कामगारांचे आर्थिक नुकसान करावे. परंतु, जे संपावर आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नो वर्क नो पे हे तर करणारच, पण एक दिवसाला आठ दिवस कापणे हे कर्मचार्‍यांच्या दृष्टीने योग्य नाही. पण आम्हाला अशा कोणत्याही कारवाईला भाग पाडू नका, असे आवाहन मी कर्मचार्‍यांना करत आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर कामावर यावे, असे आवाहनही मी त्यांना करतो.

21 डेपोतील 9,705 कामगार रुजू
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील 21 डेपो अंशतः सुरु झाले असून 9 हजार 705 कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. संप निवळत असल्याची ही चिन्हे दिसत आहेत. महामंडळाचे काम सुरु होताच राज्यभरातील विविध आगारांमध्ये कर्मचारी रुजू झाले. एकूण 9 हजार 705 कामगार सेवेत पुन्हा रुजू झाले. त्यातील 6 हजार 482 कर्मचारी हे कार्यालयीन कर्मचारी आहेत. महामंडळाच्या विविध विभागातून संप संपून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती महामंडळाने दिली आहे.

COMMENTS