Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती प्रतिनिधी - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका

नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय – जयंत पाटील (Video)
 बिसलेरीचा ब्रँड टाटांच्या मालकीचा होणार  
मणिपूरमध्ये म्यानमार सीमेजवळ पुन्हा हिंसाचार

अमरावती प्रतिनिधी – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना धमकी आल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर फोन कॉल करणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (2), 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आगे. दरम्यान, नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. तर यापूर्वी सुद्धा खासदार नवनीत राणा यांना अशा प्रकराच्या धमक्या आल्याचे पाहायला मिळाले होते.

COMMENTS