Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालाघाटावरील शेतपिकांचे वराहांकडुन नुकसान

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची माहिती वन विभागाकडेच नाही संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्यांचा आधार:- डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - नैसर्गिक संकटासह वराह व अन्य वन्यजीवामुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी केल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असुन वनविभागा

“नीतू आणि नीलू हे माझे भाचे प्रचंड आगाऊ” 
ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात
ओशो आश्रम गोंधळप्रकरणी 125 जणांवर गुन्हा

बीड प्रतिनिधी – नैसर्गिक संकटासह वराह व अन्य वन्यजीवामुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी केल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असुन वनविभागाकडून मिळणार्‍या नुकसानभरपाई बाबत शेतकरी संभ्रमात आहेत तसेच वन्य प्राण्यांनी शेतकर्‍यांवर हल्ला केल्यानंतर किती जणांना मदत मिळाली याविषयी माहिती विभागीय वन कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली असुन प्रशासनाने याबाबत जागृती राबवुन शेतकर्‍यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार बीड,विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) बीड यांना केली असुन सध्या तरी शेतकरी रंगीबेरंगी साड्यांचे शेताभोवती कुंपन करत नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश सर्कल मधिल डोंगराळ भागातील पिंपरनई , पोखरी (घाट), बेलगाव फुकेवाडी,सोमनाथवाडी, आदि परीसरातील शेतशिवारात संचार करणार्‍या वराहांनी धुमाकूळ घातला असुन वराहाच्या झुंडीच्या झुंडी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करत असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. शेतातील सोयाबीन, भुईमूग आदि उगवलेल्या पिकांची डुकरे खाण्यापेक्षा नासाडी जास्त करतात.रंगीबेरंगी साड्यांना घाबरून डुकरे तिकडे फिरकत नाहीत म्हणून आम्ही पिकाला साड्यांचे कुंपण केले आहे. दुष्काळात तेरावा म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस शेतातील वाढत चाललेला उत्पादन खर्च, शेतमालाचे पडलेले भाव,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या शेतकर्‍यांना वन्यप्राण्यासह आता वराहांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये मनुष्यहानी तसेच पशुधन,मृत,अपंग,व जखमी झाल्यास देण्यात येणार्‍या रकमेत राज्य शासनाने आगस्ट 2022 मध्ये मदतवाढ केलेली असुन वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी किंवा व्यक्ती मृत झाल्यास 20 लाख रुपये दिले जातात त्यात धनादेशाद्वारे तात्काळ 10 लाख रुपये व उर्वरित 10 लाख रुपये फिक्स डिपाझिट केले जाते. तसेच व्यक्ती अपंग झाल्यास 5 लाख रुपये,जखमी झाल्यास 1 लाख 25 हजार, किरकोळ जखमीस 20 हजार रुपये तसेच पशुधनामध्ये गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या 75 टक्के किंवा 70 हजार रुपये, अपंगत्व आल्यास बाजारभाव किंमतीच्या 50 टक्के किंवा 15 हजार रुपये,जखमी झाल्यास बाजारभाव किंमतीच्या 25 टक्के रक्कम किंवा 5 हजार रुपये दिले जातात. बीड जिल्ह्यात मागच्या    वर्षभरात शेतकरी व जनावरांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केलेल्या घटनांची विभागीय वन कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसुन वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना मदत दिली नसल्याचे दिसून येते. हि अतिशय गंभीर बाब आहे.

COMMENTS