Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मोचा’ चक्रीवादळ धडकणार

पुणे ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्याचे मोचा चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ आता उग्र रूप धारण करत पुढे पुढे सरकत आ

पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून उडताना दिसले ड्रोन
राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
लसीमधील अंतर वाढविण्याची शिफारसच नव्हतीः शास्त्रज्ञ

पुणे ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्याचे मोचा चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ आता उग्र रूप धारण करत पुढे पुढे सरकत आहे. मोचा वादळ पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर या आठवड्यातच धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या वादळामुळे पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ शुक्रवारी तीव्र रुप धारण करु शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या मते या चक्रीवादाळाचा ताशी वेग 130 किलोमीटरपर्यंत असू शकतो. मोचा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात ही होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट ओढावले आहे. पिकाचे यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे मते, मोचा चक्रीवादळ 11 मेपर्यंत मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरावर 120 किमी/प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

COMMENTS