पुणे : मोचा चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. हे वादळ बांग्लादेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीवर धडकणार
पुणे : मोचा चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. हे वादळ बांग्लादेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे वायव्य भारतात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच या वादळामुळे हवेतील आद्रता शोषून घेतली जाणार असून महाराष्ट्रातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळचा प्रभाव पूर्व भारतापासून बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत पडण्याची शक्यता आहे. येमेनमधील ‘मोचा’ या बंदरावरुन या चक्रीवादळाचे नाव ‘मोचा’ असे पडले आहे. या परिस्थितीत वार्याचा वेग 50 पेक्षाही अधिक राहू शकतो. बहूतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वार्याचा प्रभाव महाराष्टावर असल्याने सहा मे पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासंदर्भात हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यात आता बंगालच्या उपसगारात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मोचा नामक चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. हे वादळ हवेतील आद्रता शोषून घेणार असल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अवकळी पावसाचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण होणार आहे. हवामान विभागाने पुण्याला येत्या 72 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे. पुढील 5 दिवस वातावरण ढगाळ राहून अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात 4 ते 7 मे दरम्यान मेघगर्जना आणि वादळी वार्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वेगळ्या भागात हलक्या ते हलक्या पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे, हळूहळू दक्षिणी द्वीपकल्पातील आर्द्रता अगदी महाराष्ट्र राज्यातूनही हे वादळ ओढून घेणार असून त्यामुळे 7 मे पासून आपल्या राज्यातील कमाल तापमान हळूहळू वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याकडून 5 दिवसांचा अलर्ट – आगामी 5 ते 7 मे दरम्यान हे चक्रीवादळ तयार होऊन ते भारताच्या बंगाल आणि ओडीशा या राज्यांना धडकणार आहे. या सोबतच बांग्लादेशला देखील हे वादळ धडकणार आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा देखील अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने येत्या 5 दिवसांसाठी अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वार्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे समुद्रात न उतरण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे.
COMMENTS