ओबीसी आरक्षणाच्या जनगणना झाल्यावर निवडणूक घेण्यास हरकत नाही… राज ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाच्या जनगणना झाल्यावर निवडणूक घेण्यास हरकत नाही… राज ठाकरे

प्रतिनिधी : पुणेमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले. राज ठाकरे म्ह

भुजबळानंतर आता धनंजय मुंडेना धमकी
मी दिलेल्या निधीवरच लंकेंकडून विकासाच्या गप्पा
ढवळ्या च्या बाजूला पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला – अतुल लोढें  

प्रतिनिधी : पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, जर ओबीसी समाजाचं नुकसान होणार असेल तर निश्चित स्थगिती द्यायला हवी. पण ओबीसी आरक्षणाचा तिढा लवकर सुटणार असेल तर त्याला माझी मान्यता असेल.

निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घेण्याची गरज आहे. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचं कारण देऊन निवडणुका लांबणीवर टाकायच्या.

त्यानंतर महापालिकांवर राज्य सरकारकडून प्रशासक नेमून आपल्याच हातात महापालिका प्रशासन ठेवण्याचा सरकारचा इरादा आहे.

सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत.

मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे.

पण खरंतर राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे. ठरवलं तर ओबीसी जनगणना केली जाऊ शकते.

ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असे स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी दिले.

COMMENTS