Homeताज्या बातम्यादेश

‘मोचा’ चक्रीवादळ धडकले

बांग्लादेश-म्यानमारच्या समुद्रकिनार्‍यावर मुसळधार पाऊस

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा चक्रीवादळ तयार झाले असल्याचा इशारा देण्यात

दत्त शुगर कारखान्यातील प्रदुषणामुळे साखरवाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अस्तित्वात नसलेली जमिनीची लाखो रुपयांना विक्री | LOKNews24
गडचिरोलीतून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा चक्रीवादळ तयार झाले असल्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर या चक्रीवादळाने आता उग्र रूप धारण केले असून ते 200 किमी प्रति तास वेगाने बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनार्‍यावर धडकलं आहे. त्यामुळे बांगलादेश-म्यानमारच्या सीमावर्ती भागात मुळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांनी किनारपट्टीजवळ जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाचा बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागातील जिल्ह्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉक्स बाजार परिसरातून एक लाख 90 हजार लोकांना, तर चितगावमधून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रोहिंग्या नागरिक राहत असल्याची माहिती स्थानिक विभागीय आयुक्त अमिनुर रहमान यांनी दिली आहे. बांग्लादेशप्रमाणे म्यानमारमधील राखीन भागातील 10 हजार नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सुरु असलेल्या विश्‍व खाद्य कार्यक्रमांतर्गत येथील नागरिकांनी अन्न आणि इतर मदत दिली जात आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम ईशान्य-पूर्व भारतातील काही भागांवरही होण्याची शक्यता असून नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एनडीआरएफच्या आठ टीम पश्‍चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एनडीआरएफचे 200 बचावकर्ते कार्यरत असून 100 बचावकर्ते राखीव ठेवण्यात आले आहेत. मोचा चक्रीवादळ सिडू चक्रीवादळानंतरचे सर्वात मोठे चक्रीवादळ आहे. सिडू चक्रीवादळ हे नोव्हेंबर 2007 मध्ये बांगलादेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकले होते. या चक्रीवादळामुळे तीन हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. मोचा चक्रीवादळामुळे खराब हवामानामुळे कोलकाता ते पोर्ट ब्लेअरला जाणार्‍या विस्तारा विमानाला यू-टर्न घ्यावा लागला. या विमानाने कोलकाता विमानतळावरून सकाळी 9.05 वाजता पोर्ट ब्लेअरसाठी उड्डाण केले. 11:40 वाजता ते पोर्ट ब्लेअरला उतरणार होते, पण मोचा वादळामुळे हवामान खराब झाले. यामुळे ते कोलकात्याकडे परत वळवण्यात आले.

ईशान्येडील राज्यांना धोक्याचा इशारा- हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मोचा चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्येकडे सरकले आहे. अंदमान-निकोबार, पश्‍चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. धोका लक्षात घेता बंगालमधील दिघा येथे एनडीआरएफच्या 8 पथके आणि 200 बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 100 बचावकर्ते राखीव ठेवण्यात आले आहेत.

COMMENTS