संगमनेर : संगमनेर शेतकी संघ ही सहकारातील मातृ संस्था असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता, पारदर्शकता, योग्य भाव या सर्व गो
संगमनेर : संगमनेर शेतकी संघ ही सहकारातील मातृ संस्था असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता, पारदर्शकता, योग्य भाव या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांची कायम शेतकी संघास प्रथम पसंती राहिली आहे .शेतकी संघाने ही शेतकऱ्यांचा व जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवला असल्याचे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले आहे.
संगमनेर शेतकी संघाच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीक संवर्धन विभागाच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत डॉ. जयश्रीताई थोरात, चेअरमन संपतराव डोंगरे, व्हा चेअरमन सुनील कडलक, पांडुरंग पा. घुले, सचिन दिघे, अनिल कांदळकर ,अजय फटांगरे, अमृतवाहिनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, यशोधन कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन भांड, कार्यालयीन अधीक्षक रामदास तांबडे, मॅनेजर अनिल थोरात आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रजीतभाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर शेतकी संघ ही सहकारातील मातृ संस्था आहे. राज्यातील अनेक शेतकी संघ बंद पडले आहे मात्र संगमनेरचा शेती संघ दिमाखात उभा आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खते व औषधे एकाच ठिकाणी मिळावे म्हणून संगमनेर शेतकी संघाने पीक संवर्धन विभागाची सुरुवात केली आहे. यामुळे दर्जेदार व नामांकित कंपन्यांची शेती उपयोगी रासायनिक खते व कीटकनाशके आता योग्य दरात येथे उपलब्ध होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारी बी बियाणे खते व औषधे शेतकी संघामार्फत योग्य दरात पुरवली जातात. सहकार जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शेतकी संघाने गुणवत्तेच्या बाबतीत आपला लौकिक कायम ठेवला आहे. तरी याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी संचालक साहेबराव बारवे , बाळकृष्ण होडगर ,ज्ञानेश्वर सांगळे किरण नवले, भाऊसाहेब नवले ,संतोष नागरे ,तुकाराम कोठवळ शिवाजी आहेर ,प्रभाकर सोनवणे महादू खेमनर, संजय शिरसागर ,भास्कर गोपाळे ,विनायक काळे , कार्यालयीन अधीक्षक भरत काळे, सर्व विभाग प्रमुख आदि मान्उयवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले, प्रास्ताविक संपतराव डोंगरे यांनी केले तर आभार मॅनेजर अनिल थोरात यांनी मानले.
COMMENTS