न्यायालयीन वेळा आणि काही प्रश्‍न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायालयीन वेळा आणि काही प्रश्‍न

आज देशभरात तब्बल 4 कोटी 18 लाखांपेक्षा अधिक केसेस पेडिंग आहेत. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेत हजारो न्यायमूर्तींची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक खटल्यांचा

आपचा राजकीय सूर !
सोयीचे राजकारण, मुखवट्याचे धोरण
गुजरातमधील राजकीय रणधुमाळी

आज देशभरात तब्बल 4 कोटी 18 लाखांपेक्षा अधिक केसेस पेडिंग आहेत. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेत हजारो न्यायमूर्तींची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक खटल्यांचा लवकर निपटारा होत नाही. त्यामुळे अनेक केसेस पूर्णत्वाला जाण्यासाठी आणि निकाल येण्यासाठी दशक, तर कधी दोन दशकांचा कालावधी लागतो. त्यामुळे अनेक जण म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. मात्र या सर्व नकारात्मक बाबींमध्ये काल एक सकारात्मक बाब समोर आली. जर लहान मूल सकाळी 7 वाजता शाळेत जाऊ शकते, तर न्यायालय सकाळी लवकर कामकाज का करू शकत नाही, असा उद्वविग्न सवाल वरिष्ठ न्यायाधीश उदय ललित यांनी करत, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला एक तास आधीच सुरुवात करत, एक आदर्श निर्माण केला. भारतीय संविधानांनुसार न्यायपालिका स्वतंत्र असून, तिच्या कामात कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या खटल्याला भले ही उशीर लागो, मात्र कोणत्याही निरपराध व्यक्तीला शिक्षा नको, आपल्या न्यायपालिकेचा पवित्रा आहे, तो नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र त्याचप्रमाणे न्यायालयाचे कामकाजांना होणारा उशीर, तारीख-पे-तारीख याचा सर्वसामान्यांना कंटाळा येतो. तर दुसरीकडे यातून गुन्हेगांरांना शिक्षा होण्यास विलंब होतो. त्यामुळे कुठेतरी या निवाडयांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र या केसेसला होणारा विलंब, त्यामुळे नागरिकांचा त्रागा वाढत जातो, तर कधी न्यायव्यवस्थेविषयी संताप व्यक्त होतो. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती उदय ललित यांनी उचललेले पाऊल सकारात्मक असून, न्यायव्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा त्यांच्या हातून होऊ शकतात, असे संकेत यानिमित्ताने दिसून येत आहे. आपण जनतेशी बांधील असून, त्यांचे न्यायनिवाडे वेळेत करणे, आपले कर्तव्य असून, वेळेआधी जर न्यायालयाने काम केले, तर काही फरक पडणार नाही, असा त्यांचा सूर आशादायी आणि आश्‍वस्त करणारा वाटतो. सर्वोच्च न्यायालयाचे काम हे साधारतः सकाळी 10:30 वाजता सुरु होते. आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपते. त्याचबरोबर दुपारी 1 ते 2 अशी एका तासाची जेवणाची सुट्टीही न्यायाधिश घेतात. हे असे असतानाच मात्र न्यायाधीश उदय ललित यांच्या अध्यक्षतेखाली कामे करत असलेल्या खंडपीठाने निहायमित कामाच्या वेळच्या एक तास आधीच म्हणजेच सकाळी 9:30 वाजता न्यायालयात दाखल होऊन सुनावणीला सुरुवात केली. उदय ललित यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्यासमवेत न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांचाही समावेश होता. उदय ललित यांचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे उदय ललित यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी सकाळी 9 वाजता न्यायालयीन कामकाजाला असुरुवात करा आणि त्या नंतर 11:30 वाजता म्हणजेच अडीज तासाने विश्रांती घेऊन 12 वाजता पुन्हा कामाला सुरुवात करा कानी दुपारी 2 वाजता आपली कामे पूर्ण करा. म्हणजेच त्या नंतर मिळणार्‍या वेळेचा सदुपयोग करून घेता येईल. या मिळालेल्या वेळेचा उपयोग सायंकाळी लांब पल्ल्याच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. असं मत वरिष्ठ न्यायाधीश उदय ललित यांनी व्यक्त केले.न्यायमूर्ती उदय ललित हे पुढल्या महिन्यात म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्याकडून उदय ललित पदभार स्वीकारतील. 27 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर पर्यंत सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ असेल. या काळात मोठया प्रमाणात न्यायालयीन सुधारणा झाल्यास नवल नको.

COMMENTS