Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडी शर्यतीला कोर्टाची मान्यता : आ. सदाभाऊ खोत यांची बैलगाडीतून मिरवणूक

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल रयत क्रांती संघटने

एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द
बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार : ना. अजित पवार यांची माहिती
खटाव तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबीसह दोन ट्रॅक्टरवर कारवाई

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांचे इस्लामपूर येथे बैलगाडी चालक-मालक यांच्याकडून बैलगाडीतून मिरवणूक काढत फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीच्या सशर्त परवानगी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल जाहीर केला. तज्ज्ञ वकीलांची नेमणूक करण्याबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी निर्णय घेतला. विरोधी पक्षकारांनी मोठी फी असलेले वकील नेमले होते. मग, बैलगाडी शर्यतीचा खटला लढण्यासाठी त्या तोडीचे वकील देण्याकरिता लागणारा खर्च हा राज्य सरकारच्या माध्यमातून होईल, असा महत्त्वाचा निर्णय त्यावेळी घेतला गेला. त्याचा आज बैलगाडा शर्यतप्रेमींना फायदा झाला आहे.
अखिल बैलगाडा संघटनेने बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यानुसार तत्कालीन सरकारने या बाबतीत समिती नेमून अहवाल 2 महिन्यात सादर करण्याबाबत आदेश दिले. प्रत्येक प्राणी आपल्या क्षमतेनुसार धावू शकतो, असा अहवाल समितीने न्यायालयात सादर केला. त्यामुळे बैलगाडी मालकांना दिलासा देणारा निर्णय न्यायालयाने दिला. त्या अनुषंगाने आ. सदाभाऊ खोत सकाळी मुंबईहून इस्लामपूरमध्ये येताच तालुक्यातील सर्व बैलगाडी मालकांनी एकत्र येऊन पंचायत समिती ते मोमीन मोहल्लापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीत करत आ. खोत यांना बैलगाडीत बसवून जल्लोषात स्वागत केले.
यावेळी तालुक्यातील सर्व बैलगाडी मालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS